● सर्व बाबींवर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवले जाणार
सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्काडा नियंत्रण प्रणालीचे कामे गतीने सुरू आहेत. Installation of wall and water meters at various places under ‘SCADA’ system at speed Solapur water supply Water shortage पाकणी प्लांट येथे इनलेट व आउटलेटवर वॉटर मीटर बसवून घेण्यात आले तसेच कोंडी एमबीआर, एच.एस.आर, सिद्धेश्वर प्रशाले जवळ, कलेक्टर कचेरी पंचायत समिती ऑफिसच्या बाजूला वॉल्व व मीटर बसविण्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्ही. बी. चौबे यांनी दिली.
स्मार्ट सिटीच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांच्या आदेशानुसार सोलापूर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्काडा नियंत्रण प्रणालीचे काम 10 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आले आहे. 25 दिवस हे काम चालणार आहे. आजपर्यंत काही कामे करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत उजनी जलवाहिनी, पाकणी जलशुध्दीकरण केंद्र, सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्र, भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्र व टाकळी जलवाहिनी येथे विविध प्रकारचे कामे करण्यात येत आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी 5 रोटेशन मध्ये शटडाऊन घेण्यात येत आहे. उजनी येथील कामासाठी 3 रोटेशन , हिप्परगा, भवानी पेठ आणि रोटेशन तर एचएसआर भवानी पेठसाठी प्रत्येकी एक रोटेशन शटडाऊन घेण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● “स्काडा” अंतर्गत आतापर्यंत ही कामे झाली
दरम्यान, पहिल्याच दिवशी उजनी लाईन पाकणी व एमबीआर येथील येथील कामे हाती घेण्यात आली. पाकणी प्लांट येथे इनलेट व आउटलेटवर वॉटर मीटर बसवून घेण्यात आले. कोंडी एमबीआर येथे वॉल्व व मीटर बसवण्यात आले. एच.एस.आर येथे 762 मिमी व्यासाच्या पाईप लाईन वर वॉल व मीटर बसवून घेण्यात आले आहे. सिद्धेश्वर प्रशालेजवळ वॉल्व व मीटर बसविण्यात आले. कलेक्टर कचेरी पंचायत समिती ऑफिसच्या बाजूला वॉल्व व मीटर बसून घेण्यात आले. पाकणी येथील काम झाले आहे.
गुरुवारी (ता.16) कोंडी येथील काम करण्यात आल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्ही. बी. चौबे यांनी सांगितले.
यामुळे सोलापूर शहरातील पाणीपुरवठा दि. 10 फेब्रुवारी 2023 ते पुढील 25 दिवसापर्यंत 3 ऐवजी 4 दिवसानंतर होणार आहे. 4 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणताही बदल होणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
● “स्काडा” प्रणालीमुळे पाणीपुरवठ्याचे नेटके नियोजन
स्काडा प्रणाली अंतर्गत उजनीपासून ते जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध करण्यापासून नागरिकांच्या घरी पोहचवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया व नियंत्रण संगणकीय प्रणालीद्वारे केली जाईल. त्यासाठी महापालिकेतर्फे नियंत्रण कक्ष, पाण्याच्या टाक्या, अशा प्रत्येक ठिकाणी व्हॉल्व्ह व मीटर बसविण्यात येत आहेत. ज्यामधून किती पाणी उपलब्ध आहे ? पाण्याचा दाब किती प्रमाणात आहे ? किती पाणी सोडायचे आहे? यासारख्या अशा अनेक गोष्टींवर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. एकूणच शहराला नियोजनपूर्वक पाणीपुरवठा करण्यासाठी मदत होईल.