● दहा लाखांची रक्कम हस्तगत; गुन्हे शाखेची कामगिरी
सोलापूर : परिस्थिती गरिबीची होती,त्यामुळे लग्न जुळत नव्हते. सोबत लाखो रुपये असतील तर लग्न जुळेल. या भ्रमात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने शक्कल लढवली. संधी येताच त्याने चक्क मालकाच्या घरावरच दरोडा टाकून तब्बल दहा लाख रुपयांची लूट केली. A driver steals from the owner’s house for his own wedding; Crime Branch Solapur caught while about to leave Solapur
परंतु ही चोरी त्याला जास्त वेळ पचली नाही. केवळ १२ तासाच्या आत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सिव्हिल हॉस्पिटलजवळ असलेल्या पोटफाडी चौकात त्यास ताब्यात घेऊन जेरबंद केले. नागेश ऊर्फ अमित सूर्यकांत भरडे (वय-३४,उत्तर कसबा,टिळक चौक,सोलापूर) असे त्या चोरट्या ड्रायव्हरचे नाव आहे.
या घटनेची हकीकत अशी की, संतोष विजयकृष्ण कुलकर्णी यांचे जुळे सोलापूर येथे व्दारकादीश मंदिरासमोर सानवी अपार्टमेन्ट येथे फ्लॅट आहे. सध्या ते इंद्रधनु येथील फ्लॅट मध्ये राहत आहेत. संतोष कुलकर्णी यांनी त्यांच्या शेतीच्या उत्पन्नातून मिळालेली १० लाख रुपये रोख रक्कम ही त्यांचे सानवी अपार्टमेंन्ट येथील फ्लॅटच्या बेडरूम मधील लाकडी कपाटात डिसेंबर २०२२ मध्ये विभागुन ठेवली होती.
त्या ठिकाणी त्यांचे ड्रायव्हर व मित्रांचे येणे जाणे होते. दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी संतोष कुलकर्णी यांनी त्यांचे सानवी अपार्टमेन्ट येथील बेडरूमच्या कपाटात ठेवलेली रक्कम घराचा कडी-कोंयडा तोडून चोरून नेली. याबाबत त्यांनी सर्वत्र चौकशी केली शेवटी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने तपास करत चोरलेल्या रक्कमेतील काही रक्कम घेऊन सोलापूर सोडण्याच्या बेतात असतानाच शहर गुन्हे शाखेने त्या आरोपीस पोटफाडी चौकात अटक केली. चोरलेली पूर्ण रक्कम त्याने परत केली.
पोलीस निरीक्षक सुनील दोरगे,पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर,राजु मुदगल,कुमार शेळके,महेश शिंदे,कृष्णात कोळी,सिध्दाराम देशमुख,प्रविण शेळकंदे,रत्ना सोनवणे,सतिश काटे या पथकाने ही कामगिरी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● गुन्हे शाखेने बारा तासात लावला छडा
एकीकडे घरची परिस्थिती गरीब दुसरीकडे वाढतं वय बघून कोणी लग्न करायला तयार नाही या हेतूने ड्रायव्हरने चांगलीच शक्कल लावत स्वतःच्या लग्नासाठी मालकाच्या घरात दहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या घटनेचा बारा तासात छडा लावत ड्रायव्हरला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रक्कम हस्तगत केली. त्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने ड्रायव्हरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
□ सोलापूर । शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शरणप्पा तोरवी यांचे निधन
सोलापूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खोखो संघटक शरणप्पा मल्लप्पा तोरवी (वय ८५) यांचे आज सोमवारी (ता. २०) निधन झाले. उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि सोलापूर जिल्हा खोखो असोसिएशनच्या प्रचार व प्रसारात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी रूपाभवानी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुली असा परिवार आहे.
खासदार शरद पवार महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष असताना त्यांनी सरचिटणीस व कार्याध्यक्ष ही महत्वाची पदे भूषविली होती. खो-खो असोसिएशनच्या माध्यमातून राज्यभरात खो-खो चा प्रचार, प्रसार अन् खो-खो खेळाविषयीची जनजागृती करण्याचे काम तोरवी यांनी प्रामाणिकपणे केले होते. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गर्शनाखाली सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक खो-खो खेळाडूंनी विविध पातळीवर यश मिळवले आहे.