Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजन पाटलांना भाजपाचे आमंत्रण, बबनदादांकडून स्वीकारला सत्कार;  सावंतांचा दौरा एक, घडामोडी अनेक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

राजन पाटलांना भाजपाचे आमंत्रण, बबनदादांकडून स्वीकारला सत्कार;  सावंतांचा दौरा एक, घडामोडी अनेक

Surajya Digital
Last updated: 2023/02/23 at 10:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

• सोलापूर/ अजित उंब्रजकर

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लीन

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बुधवारी (ता.22) सोलापूर दौऱ्यावर आले.  Rajan Patal invited by BJP, felicitated by Babandada; The visit of the savant is one, the events are many अनेक भेटी – गाठी आणि सत्कारामुळे डॉ. सावंतांचा हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला. या दौ-यात त्यांनी माजी आ. राजन पाटलांना भाजपाचे आमंत्रण दिले, माढ्यात बबनदादांचा तर सोलापुरात शिवसेनेचा सत्कार स्विकारला. त्यामुळे त्यांचा सोलापूर दौरा लक्षवेधी ठरला.

 

सोलापुरातील एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत बुधवारी सोलापुरात आले होते. सुरूवातीला विमानतळावर त्यांचे स्वागत आ. सुभाष देशमुख यांनी केले. त्यानंतर ते आ. देशमुखांच्या निवास्थानी गेले. यानंतर त्यांनी अनगर येथे राजन पाटलांच्या घरी चहापानाचा आस्वाद घेतला. त्याच दरम्यान डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रवादाच्या नवनिर्माणाचा विचार वाढवण्यासाठी राजन पाटील यांनी भाजपमध्ये यावे, अशी ऑफर दिली. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभर हाच विषय चर्चेला गेला.

 

सायंकाळच्या सुमारास ते माढ्यात डॉ. लुणावत यांच्या हुरडा पार्टीला गेले. त्यानंतर त्यांचा माढ्यात सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे हा सत्कार राष्ट्रवादीचे आमदार आ. बबनदादा शिंदे यांनी केला. दादाही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सत्कारही सर्वांच्या लक्षात राहिला. माढ्यावरून सोलापुरात येताना शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी क्रेनद्वारे मोठा हार घालत सावंत यांचा सत्कार केला. विविध घडामोडींमुळे सावंतांचा हा दौरा चांगलाच लक्षवेधी ठरला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● भाजपाच्या रणनितीची उत्सुकता

 

भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्वाची लोकसभा निवडणूक आहे. सलग तिसऱ्यांदा बहुमताने सत्ता मिळवण्याची रणनिती भाजपकडून आखली जात आहे. त्यासाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरू आहे. सोलापुरातील दोन्ही लोकसभा पुन्हा ताब्यात ठेवण्याचे नियोजन आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय सोलापुरात आले होते. त्यांनी लिंगायत समाजाचे नेते उदय पाटील यांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर आता मुख्यमंत्री सावंत यांनी राजन पाटलांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिले आहे. लवकरच आणखी एक मोठा नेता सोलापुरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

● श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत लीन

महाराष्ट्र सरकारने जमीन दिल्यास पंढरपुरात गोवा भवन उभारणार

 

पंढरपूर : गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आज पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळेस 2024 मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचे सरकार येऊ श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातले.

 

 

 

महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्या कोणाला घ्या यासाठी मी कुणाला बोललो नाही, किंवा त्यासाठी आलोही नाही, परंतु माझ्या इथे येणे जर भाजपला फायदा होणार असेल तर मला ते आवडेल. गोव्यामधील भाविक ही पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने आम्हाला पंढरपूर मध्ये जागा उपलब्ध करून दिली तर या ठिकाणी गोवा भवन उभारण्याचा प्रयत्न करतो.

 

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #RajanPatil #invited #BJP #felicitated #Babandada #visit #savant #one #events #many #politics, #राजनपाटील #भाजपा #आमंत्रण #माढा #मोहोळ #बबनदादा #स्वीकारला #सत्कार #सावंत #दौराएक #घडामोडी #अनेक #राजकीय राजकीय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आले यश; शरद पवारांचा करिश्मा कायम
Next Article न्यायालयाने हा प्रकार वैध ठरवला तर हृदयाजवळ ठेवलेल्या गोष्टीचा मृत्यू होईल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?