☆ ५ ते ९ मार्च दरम्यान पाच दिवस परिसंवाद, चर्चासत्राचे आयोजन
सोलापूर : जिल्हा कृषी विभागाच्या वतीने लक्ष्मी विष्णू मिल मैदानावर जिल्हा कृषि महोत्सव भरणार आहे. पाच ते नऊ मार्च दरम्यान पाच दिवस असे परिसंवाद, चर्चासत्र, प्रदर्शन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. District Agriculture Festival will be held at Lakshmi Vishnu Mill Ground, Solapur
महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने योगदान द्यावे, अशा सूचना आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी झालेल्या नियोजनाच्या बैठकीत दिल्या.
कृषिविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार,
शासकीय योजनांची माहिती देणे, शेतकरी, शास्त्रज्ञ संशोधन, विस्तार प्रक्रिया व विपणन साखळी निर्माण करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला आदि या महोत्सव आयोजनाचे हेतू आहे.
प्राथमिक बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार आदिंसह समितीचे सदस्य, कृषि विज्ञान केंद्राचे संशोधक, महाबीज, जिल्हा अग्रणी बँक, माविम, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध समित्यांचे गठन व सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. कृषि तसेच अन्य विभागांतील नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना यांच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन प्रदर्शन मांडणीपासून यशस्वी करण्यापर्यंतची प्रक्रिया याबाबतचे नियोजन करण्यात आले.
या महोत्सवात कृषि प्रदर्शन, विविध परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री सुविधा, विक्रेता खरेदीदार संमेलन यांच्यासह जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी व पीकस्पर्धे तील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ऑनलाइन शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर परिणाम; सोलापूर जिल्ह्यात 6500 जणांना दृष्टिदोष
सोलापूर : कोरोना महामारीमध्ये दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाद्वारे मुलांना पाठ शिकविण्यात आले. त्यामुळे मुलांनी हातात मोबाईल घेतला, तर पालकही काही बोलताना दिसत नाहीत. मात्र, त्या ऑनलाइनचा मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, होत आहे. त्याची प्रचिती सोलापुरातील मुलांच्या डोळ्यांची तपासणी केल्यावर लक्षात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण साडेसहा हजार मुलांना चष्मे लागले असून, त्यापैकी ३ हजार ९२१ मुलांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा अंधत्व निवारण समिती व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘चला मुलांनो उजेडाकडे हा उपक्रम राबविण्यात आला. तो उपक्रम आजतागायत सुरू आहे. या मोहिमेत ६ ते १८ वयोगटातील मुलांची दृष्टिदोष तपासणी आजतागायत सुरू केली. जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रुग्णालये, ०३ उपजिल्हा रुग्णालये स्तरावर मुलांची दृष्टिदोष तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ९ लाख ६३ हजार ८२९ मुलांमधील ज्या मुलांना दृष्टी दोषाची लक्षणे आहेत, त्यांची दृष्टिदोष तपासणी ‘चला मुलांनो ‘उजेडाकडे’ या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत ३ लाख ४७ हजार ४३० मुलांची दृष्टिदोष तपासणी झाली असून, यात एकूण ६ हजार ५४७ मुलांना दृष्टिदोष असल्याचे निदर्शनास आलेले आहे. दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडून चष्मे वाटप केले जात आहेत.
वर्षभरात शासनाकडून ३ हजार ९२१ मुलांचे चष्मे प्राप्त झालेले असून, त्याचे वाटप झालेले आहे. उर्वरित मुलांचे चष्मे लवकरच प्राप्त होताच वाटप केले जाणार आहे. तसेच, मोहिमेदरम्यान ७५ मुलांच्या डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया मोहिमेदरम्यान पार पाडण्यात आल्या आहेत.
या विषयी अधिक माहिती देताना जिल्हा अंधत्व निवारण समितीचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गणेश इंदूरकर म्हणाले, कोरोनात ऑनलाइन शिक्षण व मुलं जास्त वेळ मोबाईल, टीव्ही पाहत असल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यावर झाला आहे. चष्मे लागण्याचे कारणही आनुवंशिक असू शकते. कारण, शंभर मुलांची तपासणी केली असता सात ते आठ जणांना चष्मे लागतात. जिल्हा अंधत्व निवारण समिती व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.