Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनसेकडून चौकशीची मागणी; राज ठाकरे भेटीला, प्रतिक्रिया पाहता राजकीय वादाची पार्श्वभूमी…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मनसेकडून चौकशीची मागणी; राज ठाकरे भेटीला, प्रतिक्रिया पाहता राजकीय वादाची पार्श्वभूमी…

Surajya Digital
Last updated: 2023/03/03 at 4:52 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी मोठा आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

 

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे. मात्र, ‘हा निव्वळ फालतुपणा आहे, रोज सकाळी उठा, आदित्य ठाकरेंना शिव्या द्या आणि फेमस व्हा, अशी स्कीम सध्या राज्यात सुरु झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया आदित्य  ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

 

संदीप देशपांडे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या खंद्या समर्थकावर हल्ला झाल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ताबडतोब संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रूग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, नितेश राणे आदी नेते त्यांच्या भेटीसाठी आले होते. संदीप देशपांडे यांच्यावर उपचार होईपर्यंत राज ठाकरे तिथे हॉस्पिटलमध्येच थांबले. संदीप देशपांडे यांच्यावर उपचार पूर्ण झाल्यानंतर संदीप देशपांडे यांना सोबत घेऊनच राज ठाकरे हे हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसून आले.

 

हॉस्पिटमधून डिस्चार्ज घेऊन संदीप देशपांडे बाहेर येताना ते व्हिलचेअरवर बसून येताना दिसले. त्यांच्या आजूबाजूला मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. संदीप देशपांडे यांना घरी सोडवण्यासाठी राज ठाकरेंनी आपली गाडी सुद्धा देऊ केली. आपल्या गाडीतून संदीप देशपांडे यांना सुखरूप सोडवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. संदीप देशपांडे व्हिलचेअरवरून हळूहळू राज ठाकरेंच्या गाडीच्या दिशेने जात असताना राज ठाकरे मात्र मागे उभे होते. प्रत्येक वेळी आपल्या आंदोलनाने आणि आक्रमकतेने दरारा निर्माण करणाऱ्या खंद्या समर्थकाला अशा अवस्थेत पाहून राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा दिसून आली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

राजकीय वैमनश्यातुन असे प्रकारचे भ्याड हल्ले करुण जरं का महाराष्ट्र सैनिकांना घाबरवायचा प्रयत्न करत असाल तरं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी कोणं उभं आहे आहेत हे हल्लेखोरांनी व त्यांच्या सूत्रधारांनी लक्षात ठेवा.@RajThackeray @AmitThackeray24 @avinash_mns @SantoshDhuri19 pic.twitter.com/IBsyUOaRQP

— मनसे जनहित कक्ष व विधी विभाग ठाणे शहर अधिकृत (@ThaneMNSJanhith) March 3, 2023

 

सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. “अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, घाबरणारही नाही.आम्ही कुणाला भीक घालत नाही.” असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. सोबत त्यांनी हल्लेखोरांना इशारा देखील दिलाय. “असे हल्ले करून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न कोणी करू नये, यात कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहित आहे.” असं देखील यावेळी संदीप देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया पाहता राजकीय वादाची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे तर नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

 

मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज पहाटे जीवघेणी हल्ला झाला. चार ते पाच जणांनी संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि लोखंडी रॉडने हा हल्ला केला. त्यानंतर आता मनसेचे नेते संतोष धुरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘हा हल्ला पूर्वनियोजित होता. तसेच हल्लेखोर कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण हा भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना आम्ही शोधून काढूच’, असेही ते म्हणाले.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर त्यांना हिंदूजा रूग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांच्या हातावर प्लास्टर करण्यात आले. तसेच उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन देशमुख यांची भेट घेतली होती.

एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने हल्ला करण्यात आला होता. पण देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला. मात्र, त्यांच्या हाताला लागलं आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडलंय.

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Demand #inquiry #MNS #RajThackeray's #visit #reaction #background #political #controversy #SandeepDeshpande #attack #mumbai #dadar, #मनसे #चौकशी #मागणी #संदीपदेशपांडे #हल्ला #राजठाकरे #भेटीला #प्रतिक्रिया #पाहता #राजकीय #वाद #पार्श्वभूमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला; उपचारानंतर मिळाला डिस्चार्ज, पहा व्हिडिओ
Next Article पंढरपूर | खेळता – खेळता घरासमोरील हौदात पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?