□ एकही शाळा बंद होणार नाही
□ तारांकित प्रश्न अन् सरकारला जाग
मुंबई : खुषखबर… खुषखबर… गेल्या काही वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. राज्याचा शिक्षण विभाग सध्या या भरतीच्या तयारीत गुंतला आहे. 30 thousand teachers will be recruited in next 2 months in Maharashtra Starred Question Sarkar Jag Schools closed पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यात तब्बल ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. ही माहिती खुद्द शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधिमंडळात दिली आहे. त्यामुळे इच्छुकांनो, आता लागा तयारीला, द्या परीक्षा, व्हा पास आणि बना शिक्षक.
राज्यातील शाळांमध्ये अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. तसेच पटसंख्या अभावी अनेक शाळा बंद होत आहेत. आता राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एका लेखी पत्राला उत्तर देताना त्याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर आज गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली आहे. आमदार राजेश एकडेंसह काही सदस्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांची भरतीच केली नाही. अनेक विद्यार्थी डीएड आणि बीएड करून भरतीच्या प्रतीक्षेत बसून आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिकाम्या झाल्या. मात्र भरती अभावी त्या जागा रिक्तच राहिल्या आहेत. परिणामी आहे त्या शिक्षकांवरच अतिरिक्त भार पडला आहे. तरीही सरकार शिक्षक भरती काढण्याचे नाव घेत नव्हते. त्यामुळे डीएड / बीएड धारकांमध्ये सरकारविषयी कमालीची नाराजी
पसरली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यातील मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. पटसंख्या अभावी अनेक ठिकाणी शाळा बंद होत आहेत. पात्रता धारक शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती. परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.
● एकही शाळा बंद होणार नाही
२० आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आल्यामुळे सरकार या शाळा बंद करणार, असा अनेकांचा समज झाला. मात्र, ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, त्याला त्या ठिकाणी योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का ? हा मुद्दा आहे. त्यामुळे मुलांच्या हिताचा विचार करावा लागणार आहे. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
□ तारांकित प्रश्न अन् सरकारला जाग
दरम्यान आ. राजेश एकडे आणि अन्य सदस्यांनी शिक्षक भरतीसंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, डीएड/ बीएड धारकांची वाढलेली बेरोजगारी, सेवानिवृत्त शिक्षकांच्या नेमणुकीमुळे बेरोजगार तरुणांमध्ये वाढलेला असंतोष असे अनेक उपप्रश्न यावेळी उपस्थित झाले. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात ३० हजार शिक्षकांची पदे भरती जातील, अशी माहिती दिली.
□ गेल्या वर्षीही दिले होते आश्वासन
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात शिक्षणमंत्री केसरकर यांनी विधानसभेत ३० हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे आश्वासन दिले होते. अर्थ खात्याने शिक्षकांच्या ८० टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी ५० टक्के पदे तातडीने भरण्यात येणार असल्याची घोषणा केसरकरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. त्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांनीही हीच माहिती अधिवेशनात दिल्यामुळे यंदा भरती होईल, अशी आशा इच्छुकांमध्ये निर्माण झाली आहे.