मुंबई : बारावी बोर्डाचा गणिताचा पेपर फुटला होता. ‘सिंदखेड राजा तालुक्यात प्रश्नपत्रिकेतील 2 पृष्ठे व्हायरल झाली होती. Paper burst: There will be no re-examination of mathematics for 10th and 12th students या घटनेबाबत येथील पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी,’ असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राबविलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे. एकीकडे परीक्षेदरम्यान कॉपी पुरविण्याच्या घटना सुरू आहेत.
त्यातच आता शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे उघड झाले आहे. सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू झाली, मात्र त्यापूर्वीच प्रश्नपत्रिकेची दोन पाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची राज्य शिक्षण मंडळाकडून चौकशी सुरू करण्यात येत असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरे छापण्याचा प्रकार समोर आला होता. आता तर गणिताची प्रश्नपत्रिकाच व्हायरल झाल्यामुळे बोर्डाचा हा सावळागोंधळ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. बुलढाणा येथील सिंदखेडराजामध्ये हा पेपरफुटीचा प्रकार घडला आहे. मात्र नेमक्या कोणत्या परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका व्हायरल झाली हे कळू शकलेले नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यासंदर्भात सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुलढाण्यात गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्यामुळे संपूर्ण जिह्यात एकच खळबळ उडाली. हा पेपर कोणी फोडला, यामागे कोणाचा हात आहे याची तपासणी केली जात आहे.
सदर प्रश्नपत्रिका सकाळी 10.30 नंतर सोशल मीडिया वर व्हायरल झाली आहे. विद्यार्थ्यांना 10.30 नंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. तसेच व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका राज्यात कोठेही विद्यार्थ्यांना मिळाल्याचे समोर आले नाही. त्यामुळे गणिताचा पेपर पुन्हा घेतला जाणार नसल्याचे अनुराधा ओक (सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) यांनी सांगितले.
कॉपीमुक्त अभियानाचा बराच गाजावाजा करण्यात आला. त्यानंतरही महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार घडतच आहेत. आता तर परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकरण समोर येत आहे. एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यांसह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत, तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील पेपर फुटल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गणिताची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असतानाच विविध विभागीय मंडळांमधून कॉपीची 43 प्रकरणे उघडकीस आली आहेत. लातूर विभागात तर 13 कॉपी पकडण्यात आल्या. त्यानंतर नागपूर विभाग 9, संभाजीनगर 8, पुणे 5, अमरावती 5, मुंबई 3 कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर दहावीचा मराठी संयुक्त आणि कन्नड या भाषा विषयाची परीक्षा झाली. या परीक्षेदरम्यान तीन कॉपी प्रकरणे घडली. यातील प्रत्येकी 1 नागपूर, संभाजीनगर आणि मुंबई विभागात पकडण्यात आली.