वेळापूर : वेळापूर (ता. माळशिरस) गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र ९६५ चे व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या शेजारील दक्षिण बाजूच्या तसेच उत्तर बाजूच्या गाळेधारक टपरी धारक यांना जाणून बुजून अन्यायकारक दुजाभाव करून अधिक गृहीत जागेचा निवाडा केला नाही व नुकसान भरपाई मिळाली नाही. To get compensation to flood-affected gale holders; Malshiras Solapur started a cyclical fast in front of the district magistrate’s office
बाधित सर्वच गाडी धारक टपरीधारक यांना नुकसान भरपाई दिल्याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचे काम करू नये यासाठी बाधित गाळेधारक – टपरीधारक यांच्या वतीने आज सोमवारी (दि. ६ मार्च) सकाळी साडेअकरा वाजले पासून चक्री उपोषणाला सुरुवात केलीय. चक्रीउपोषनाचा पहिला दिवस झाला आहे.
नुकसान भरपाईचा मोबदला मिळेपर्यंत चक्री उपोषण सुरूच ठेवणार आहोत, असे बाधित आंदोलनकर्ते यांचे म्हणणे आहे . याप्रसंगी चक्री उपोषणास होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचे नेते दादासाहेब नामदास, अभिजीत केंगार, क्रांतिकारी संघटना नेते गणेश भोसले, रिपाइं तालुका उपाध्यक्ष संजय भोसले, रिपाइं वेळापूर युवक शहराध्यक्ष स्वप्निल सरवदे, रायचंद खाडे, प्रदीप सरवदे, राहुल सराटे, भागवतराव गायकवाड, संतोष कदम यांनी चक्री उपोषण स्थळी भेटून पाठिंबा दिला आहे.
यावेळी रिपाइं आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, एससी मोर्चा ता सरचिटणीस अजित साठे, अरुण वाघ, आलमगीर तांबोळी, नवनाथ माने, नारायण साठे, विष्णू कुदळे, इलाई तांबोळी, सद्दाम तांबोळी, फिरोज मुलाणी, हनुमंत सस्ते, इकबाला आतार ,विजय रणदिवे, समाधान पनासे, प्रभाकर भगत, नवनाथ सस्ते, परवेज शेख, मेहताब तांबोळी इत्यादी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर जिल्यातील 29 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामधील २९ पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड यांची अकलूज पोलिस ठाण्यातून (संलग्न मंदिर सुरक्षा पंढरपूर) करमाळा येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातून सांगोला येथे बदली झाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांची यांची माळशिरस पोलीस ठाण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण यांची मोहोळ पोलिस ठाण्यातून सांगोला येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांची मंगळवेढा येथे बदली झाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांची सांगोला पोलिस ठाण्यातून टेंभुर्णी येथे बदली झाली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरराव ओलेकर यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथून मोहोळ येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामणे यांची मंगळवेढा येथून वैराग पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांची सांगोला येथून मोहोळ पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे यांची मंगळवेढा येथून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांची मोहोळ येथून पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब माने यांची सांगोला येथून पंढरपूर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर यांची सोलापूर तालुका येथून करमाळा पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांची करमाळा येथून सांगोला पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांची माढा येथून कुर्डवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे यांची करकंब येथून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांची पंढरपूर येथून करकंब पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांची कुर्डुवाडी येथून बार्शी शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने यांची करमाळा येथून बार्शी शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सारिका शिंदे यांची अकलूज येथून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक मनीषा महाडिक यांची पंढरपूर शहर येथून अकलूज पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक महिबूब अ. अजीज शेख यांची करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी येथून मोहोळ पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद यांची टेंभुर्णी येथून सांगोला पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे यांची सांगोला येथून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे यांची मोहोळ येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाढ यांची बार्शी शहर येथून करमाळा पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे यांची करकंब येथून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गोदे यांची पंढरपूर ग्रामीण येथून कामती पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. श्रेपोलिस उपनिरीक्षक दिलीप सलबते यांची मंद्रूप पोलिस ठाण्यातून वाचक उपविभागीय पोलिस अधीकारी सोलापूर येथे बदली झाली आहे.