Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शी शहर पोलिसांचा गाफीलपणा नडला, एपीआयसह चौघांवर निलंबनाची कारवाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बार्शी शहर पोलिसांचा गाफीलपणा नडला, एपीआयसह चौघांवर निलंबनाची कारवाई

Surajya Digital
Last updated: 2023/03/08 at 10:06 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
》हा झाला गाफीलपणा :  पहिल्या दिवशी बलात्कार, दुसर्‍या दिवशी सत्तूरने वारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

सोलापूर : पोलिस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून पीडित अल्पवयीन मुलीवर खुनी हल्ला करण्यात आला. याची दखल घेत एका एपीआयसह दोन पीएसआय, एक हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले आहे. Negligence of Barshi city police, suspension action against four including API Special Inspector General of Police  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आज बुधवारी (ता. 8 मार्च ) ही कारवाई केली.

 

एपीआय महारुद्र परजणे, बार्शी तालुक्यातील पीएसआय राजेंद्र मंगरुळे डब्ल्यूपीएसआय सारिका बजरंग गुटकुल, बार्शी शहरचे अरुण हेड कॉन्स्टेबल भगवान माळी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. कर्तव्यात कसूर करणै, गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न करणे असा ठपका ठेवून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

 

》हा झाला गाफीलपणा :  पहिल्या दिवशी बलात्कार, दुसर्‍या दिवशी सत्तूरने वार

 

इयत्ता बारावीमध्ये शिकणारी 17 वर्षांची मुलगी. ट्युशन संपवून घरी जात असताना मोटारसायकलवरून पाठलाग करणार्‍या दोघांपैकी एकाने अडवून तिच्यावर बलात्कार केला. त्याची फिर्याद दाखल होऊन चोवीस तास उलटल्यानंतर पुन्हा त्याच दोन आरोपींनी पिडितेच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार करत तिच्यावर खुनी हल्ला केला. त्याची दुसरी फिर्यादही दाखल झाली. पहिली फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे मोकाट फिरणार्‍या आरोपींनी दुसरा गुन्हा केला. पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतरच तात्काळ पोलिसांनी तत्परता दाखवली असती तर खुनी हल्ल्याची घटनाच घडली नसती, अशी भावना बार्शीकरांमधून व्यक्त होत असून शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

 

हा प्रकार बळेवाडी (ता. बार्शी) येथील एका अल्पवयीन मुलीसोबत घडला आहे. सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या संबंधित मुलीवर दि. 5 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे दि.6 मार्च रोजी रात्री त्याच आरोपींनी पिडीत मुलीवर तिच्या घरात घुसून कोयता आणि सत्तूरने वार केले. त्यानंतर तिसर्‍या दिवशी म्हणजे दि. 7 मार्च रोजी बार्शी शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती रात्री उशिरा दिली. अक्षय विनायक माने (वय 23) आणि नामदेव सिध्देश्‍वर दळवी (वय 24, दोघेही रा. बळेवाडी, ता. बार्शी) अशी आरोपींची नावे असल्याचे बार्शी शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● पाठलाग करून अडवले आणि केली बळजबरी

पिडीत मुलगी रविवारी बार्शी येथे ट्युशनसाठी आली होती. ट्युशन संपवून स्कुटीवरून परत गावाकडे जात असताना अक्षय माने आणि नामदेव दळवी या दोघांनी तिचा मोटारसायकलवरून पाठलाग सुरू केला. रेल्वे रूळ ओलांडून कासारवाडीजवळ आल्यानंतर पिडितेच्या स्कुटीला मोटारसायकल आडवी लावून तिला थांबवले. त्यानंतर दोघांपैकी एकाने तिला ओढत नेऊन बाजूच्याच शेतामध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले. पिडितेने घरी जाऊन हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरूध्द फिर्याद दिली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम 376,354,341,323, 504,506,34 नुसार दोन्ही आरोपींविरूध्द दि. 5 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल केला. तपास महिला फौजदार सारिका गटकूळ करीत आहेत.

 

□ घरात घुसून केला खुनी हल्ला

इकडे बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत असताना तिकडे आरोपी गावात मोकाट फिरत होते. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 6 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी बोलावल्यामुळे पिडितेचे आईवडील पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पिडीत मुलगी घरी होती. तीच संधी साधून अक्षय माने व नामदेव दळवी यांनी तिचे घर गाठले. तिच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने सपासप वार केले. त्यात तिच्या हाताची दोन बोटे तुटली असून ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

याप्रकरणी त्याच दोन्ही आरोपींविरुध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 307,324, 326,452,506, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पुढील तपास करीत आहेत.

 

□ बार्शी शहर पोलिसांचा हलगर्जीपणा नडला

रविवार दि. 5 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. पिडितेने दोन्ही आरोपींची नावे बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देतानाच सांगितली होती. मात्र त्यावेळी पोलिसांनी आरोपींना अटकेबाबत गाफीलपणा दाखवला. आरोपी हे गावातच असताना त्यांना त्वरित अटक केली नाही. परिणामी दुसर्‍या दिवशी दि.6 मार्च रोजी रात्री आठनंतर त्याच आरोपींनी पिडितेवर घरात घुसून खुनी हल्ला केला. पोलिसांनी घटना घडल्यानंतर लगेचच रात्री किंवा दुसर्‍या दिवशी दिवसभरात आरोपींना अटक केली असती तर खुनी हल्ल्याची दुसरी घटना घडलीच नसती, असा आरोप आता पोलिसांवर होत आहे.

 

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #Negligence #Barshi #city #police #suspension #action #four #including #API #SpecialInspector #GeneralofPolice, #सोलापूर #बार्शी #शहर #पोलिस #गाफीलपणा #नडला #एपीआय #चौघांवर #निलंबन #कारवाई #कोल्हापूर #परिक्षेत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळकरांची घरकुले रद्द आणि अनगरची मात्र मंजूर हा भेदभाव कशासाठी ? आसूड मोर्चात सवाल
Next Article अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन; विनोदी भूमिका अधिक गाजल्या

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?