□ जलयुक्त शिवार योजना 2 ची घोषणा
मुंबई : 2023 – 24 मध्ये महसूली खर्च 1 लाख 72 हजार कोटी निश्चि करण्यात आली होती. त्यात अनुसूचित जाती उपयोजनेच्या 13 हजार 820 कोटी तर आदिवासी विकास उपयोजनेचे 12655 कोटींचा समावेश आहे. Thousand crore revenue deficit budget; Farmers will get 12 thousand rupees Devendra Fadnavis Women Metro Extension Medical College Student Fund या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 5 लाख 47 हजार 450 कोटींची तरतूद केली आहे. यात महसुली जमा 4 लाख 49 हजार 522 कोटी तर महसुली खर्च 4 लाख 65 हजार 645 कोटी रुपये अंदाजित आहे. परिणामी 16122 कोटी रुपये महसुली तूट येत आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानभवनात अर्थसंकल्प मांडत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी 6 हजार रुपयांत राज्य सरकार अजून 6 हजारांची भर घालेल. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मिळतील. याचा लाभ 1 कोटी 15 हजार शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी 6,900 कोटींची तरतूद केली आहे.
2016 च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्याच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरणार आहे, अशी घोषणा ही फडणवीसांनी केली. शेतकऱ्याला फक्त 1 रुपये भरूप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. यासाठी वार्षिक 3 हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला आहे. 12 हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम देण्यात आली.
जलयुक्त शिवार ही यशस्वी योजना गेल्या काळात बंद करण्यात आली. ती योजना पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जलयुक्त शिवार योजना 5 हजार गावांमध्ये राबवण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात केली आहे. या योजनेसाठी मोठ्या निधीचीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनेसही 3 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.
● – जलयुक्त शिवारची घोषणा
– सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 19 हजार 491 कोटींचा निधी
– मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत रस्ते टिकाऊ व्हावेत यासाठी रस्ते बांधताना सिमेंट काँक्रीट आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
– रस्ते, पूल यासाठी 14 हजार 200 कोटींची तरतूद
– नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र
– जलयुक्त शिवार 2.0 योजनेची घोषणा.
● देवेंद्र फडणवीसांच्या घोषणा
– अमरावतीच्या रिद्धिपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होणार.
– श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन केंद्र स्थापन करून त्यासाठी 50 लाखांचा निधी
– 5 ज्योतिर्लिंगांच्या परिसर विकासासाठी 300 कोटींची तरतूद.
– सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाची घोषणा
– नाट्यगृहांच्या संवर्धनासाठी 50 लाखांचा निधी
– प्रगतीपथावरील 268 सिंचन प्रकल्पांपैकी या वर्षी 39 प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन
– दीड लाख शेतकऱ्यांना सौरकृषीपंप लावून दिले जातील. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना 2024 मार्चपर्यंत मुदतवाढ
– शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्यासाठी 30 टक्के कृषीवाहिन्यांचे सौरउर्जाकरण केलं जाईल.
– तापी महापुनर्भरण प्रकल्पाच्या विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल.
● मेट्रोच्या विस्तारासाठी भरीव तरतूद
मुंबईतील मेट्रो 10 साठी गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या 9.2 कि.मी. मेट्रोसाठी 4476 कोटींची तरतूद केली आहे. मुंबईतील मेट्रो 11 साठी वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गासाठी 8739 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रो 12 साठी कल्याण ते तळोजा या 5865 कोटी रुपयांची तरतूद. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6708 कोटी रुपये. पुणे मेट्रोची 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर.
● राज्यात 14 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकाम
राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार करण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) या 14 ठिकाणी महाविद्यालये बांधण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिली.
● विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती
– 14 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांचं काम सुरू होणार.
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत
सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार.
– 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
– 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● राज्यातील विमानतळांच्या विकासांसाठी निधीची तरतूद
• शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
– नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
• पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
– नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
– बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे
● किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी रुपये
शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 300 कोटी रुपये.
महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
आंबेगाव (पुणे) येथे शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी तर मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्यानांसाठी 250 कोटी रुपये.
● मुंबईसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
– मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
– एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
– ठाणे – वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
– गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण: 162.20 कोटी
● महाराष्ट्रात लेक लाडकी योजना
राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, इयत्ता चौथी 4000 रुपये, सहावीत गेल्यावर 6 हजार रुपये व अकरावीत 8 हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जातील.
कृषी क्षेत्रासाठी भरघोस मदत जाहीर केल्यानंतर महिलांसाठी मोठी घोषणा केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
● महिलांसाठी मोठ्या घोषणा
– बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
• चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू – क्लस्टर
– कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
– मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना – महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
– माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी , महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
● आरोग्य विभागासाठी 3520 कोटींची तरतूद
– महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा वार्षिक दीड लाखांवरून पाच लाख होणार. नव्या 200 रुग्णालयांचा यात समावेश केला जाईल.
– संपूर्ण राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 700 आपला दवाखाना सुरू केले जाणार.
– संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजारावरून 1500 इतकी वाढ.
● आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. मानधन देण्यात येणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांची 8 हजार रुपये मानधन असणाऱ्या सेविकांना 10 हजार रुपये 20 हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
• आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
• गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
• अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार.
• अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
– मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
– अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
● धनगर समाजासाठी मोठी घोषणा
– धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपयांच्या योजनेची घोषणा
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालीन किल्ल्यांचे संवर्धन होणार, 3000 कोटींची तरतूद
– एसटी प्रवासात महिलांना तिकिट दरात सरसकट 50 टक्क्यांची सवलतीची घोषणा
– महात्मा फुले आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून 5 लाखांवर रुपये