Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोयत्याने हल्ला; महिलेसह तिघे जखमी; तिघा विरुद्ध गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात कोयत्याने हल्ला; महिलेसह तिघे जखमी; तिघा विरुद्ध गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2023/03/09 at 7:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सोलापुरात महिलादिनी महिला डॉक्टरची डॉक्टरच्या विरोधात तक्रार; पशुचिकित्सक दवाखान्यात महिला डॉक्टरचा विनयभंग

सोलापूर – उपळे दुमाला (ता.पंढरपूर) येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीसात देऊन उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर तिघांनी मिळून कोयत्याने हल्ला केला. Coyote attack on Pandharpur Upazila Hospital; Three injured, including woman; Crime against three women doctor molestation त्यात महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमर्जन्सी वार्ड जवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात पंढरपूर शहरच्या पोलिसांनी तिघा सख्या भावाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

यासंदर्भात सुजाता सचिन इंगळे (वय ३४ रा. पुणे सध्या रा.पंढरपूर) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी साहिल दयानंद उर्फ जयाजी आव्हाडे, शुभम दयानंद आव्हाडे, आणि हर्षल उर्फ सोनी दयानंद आव्हाडे (सर्व रा. शेगाव दुमाला ता.पंढरपूर) या तिघाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सोमवारी सकाळी शेगाव दुमाला येथील एका कार्यक्रमात मोबाईल वरून व्हिडिओ काढण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्याची तक्रार देण्यासाठी सुजाता इंगळे यांच्यासह तिघेजण पंढरपूर तालुका पोलिसात गेले होते. तक्रार दिल्यानंतर ते सर्वजण उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात गेले होते.

 

दुपारी ३ वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या गेट जवळ वरील तिघांनी मिळून कोयत्याने मारहाण केली. त्यात सुजाता इंगळे, त्यांचे पती सचिन इंगळे आणि अनिल इंगळे असे तिघेजण गंभीर जखमी झाले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक सोनवलकर करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 सोलापुरात महिलादिनी महिला डॉक्टरची डॉक्टरच्या विरोधात तक्रार; पशुचिकित्सक दवाखान्यात महिला डॉक्टरचा विनयभंग

 

सोलापूर : सोलापुरातील एका पशुचिकित्सक दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने तेथेच कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरांच्या विरोधात विनयभंग, दमदाटी केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी या महिला डॉक्टर असून,त्यांच्याच दवाखान्यात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बागवान यांनी गेल्या महिनाभरापासून आपणाकडे पाहून अश्लील गाणी लावणे,शेरेबाजी करणे,शरीराला स्पर्श करणे असे प्रकार केले होते. त्यात पुन्हा त्यांनी ६ मार्च रोजी अशाच प्रकारे आपल्याबरोबर वागणूक केल्याने त्या महिला डॉक्टरने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या विरोधात विनयभंग व दमदाटी केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

You Might Also Like

सरकार स्थापन झाल्यापासून आरोग्य यंत्रणा ठप्प – प्रणिती शिंदे

डॉ. वळसंगकर आत्महत्या : पोलिसांनी पुन्हा मागितली मनीषाची कोठडी !

मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतरच सोलापूर कृउबासच्या सभापतीची निवड

सोलापूर विद्यापीठाकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण !

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

TAGGED: #Coyote #attack #Pandharpur #Upazila #Hospital #Three #injured #woman #Crime #three #womendoctor #molestation, #पंढरपूर #उपजिल्हा #रुग्णालय #कोयता #हल्ला #महिला #तिघे #जखमी #तिघाविरुद्ध #गुन्हा #महिलाडॉक्टर #विनयभंग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 16 हजार 122 कोटी महसुली तुटीचा अर्थसंकल्प; शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळणार
Next Article पुरोगामी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री केव्हा होणार ? महिला दिनी आ. प्रणिती शिंदे यांचा असाही हुंकार

Latest News

पुण्यात तरुणांनी इस्लामिक संघटना ‘हमास’च्या समर्थनार्थ वाटले पोस्टर
देश - विदेश May 11, 2025
राहुल गांधींच्या खटल्याच्या सुनावणीस स्थगिती मागणार नाही – सात्यकी सावरकर
देश - विदेश May 11, 2025
पुलवामा हल्ल्यात आमचा हात होता, पाक हवाई दल अधिकाऱ्याची कबुली
देश - विदेश May 11, 2025
ऑपरेशन सिंदूर भारताच्या राजकीय, सामाजिक, धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक – राजनाथ सिंह
देश - विदेश May 11, 2025
पहलगाम हल्ला ते युद्धविराम – संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची काॅंग्रेसची मागणी
देश - विदेश May 11, 2025
सरकार स्थापन झाल्यापासून आरोग्य यंत्रणा ठप्प – प्रणिती शिंदे
सोलापूर May 11, 2025
ऑपरेशन सिंदूर’च्या पोस्टरच्या टिकेनंतर दिग्दर्शकाने मागितलली माफी
महाराष्ट्र May 11, 2025
बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी
देश - विदेश May 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?