पुणे : संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. त्यानंतर पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मी या कामाबाबत समाधानी असून, हीच कामाची गती लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल. Palkhi Marg to be inaugurated in New Year, Nitin Gadkari satisfied with work, carried out aerial inspection
महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक – निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा असून या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.
या पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.
पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 जळगाव जिल्हा बँक शिवसेनेच्या ताब्यात
जळगाव : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जळगाव जिल्हा बँक शिवसेनेच्या (शिंदे गटात) ताब्यात गेली आहे. शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या मदतीने संजय पवार अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. संजय पवार हे राष्ट्रवादीतून फुटून शिवसेनेत सामील झाल्याने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या हातातून निसटली. तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. आघाडीत गद्दारी झाल्याची खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.
भाजपने शिंदे गटाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आता त्याच शिंदे गटाच्या मदतीने ‘सहकार’ क्षेत्रातही वर्चस्व निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व शिदे गटाचे नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा दूध संघात विजय मिळवित ‘राष्ट्रवादी’कॉंग्रेस व एकनाथ खडसे यांना हादरा दिला आहे.