Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय सिनेमाचा विजय; भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडदेश - विदेश

भारतीय सिनेमाचा विजय; भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार

Surajya Digital
Last updated: 2023/03/13 at 3:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : तमाम भारतीय सिनेचाहत्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. फिल्मी दुनियेतील सर्वात मोठा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर आज भारतात आला आहे.  RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याला आणि एका भारतीय लघुपटाला ऑस्कर मिळाला आहे.  Triumph of Indian Cinema; Natu Natu Anand Mahindra won two awards for India at the same Oscars ceremony यानंतर नाटू नाटू या गाण्यावर डान्स करणारा आणि या चित्रपटातील प्रमुख अभिनेता राम चरणने एक पोस्ट करत हा भारतीय सिनेमाचा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच मी अजूनही स्वप्न पाहत असल्याचे रामने सांगितले.

 

भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाल्याचा हा इतिहास घडला. याआधी, भारताने एक ऑस्कर पुरस्कार भारताला मिळाला होता तो ए.आर रेहमान यांच्या द स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याला. त्यामुळे आता मिळालेल्या या दोन पुरस्कारांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सध्या ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये बेस्ट ओरिजनल स्कोअर पुरस्कार एस एस राजामौली यांच्या RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मिळाला आहे.

आरआरआर चित्रपटाने आज इतिहास रचला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार मिळाला. ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर आनंद महिंद्रांनी ट्वीट करत विजेत्यांचे अभिनंदन केले. ऊर्जा, आशावाद, पार्टनरशिप, अशक्य विजय. ‘नाटु नाटु’ हे फक्त एक गाणे नाही : हा एक मिनी- एपिक मूव्ही आहे. सगळीकडे हे गाणे लोकांना थिरकायला भाग पाडत आहे. तसेच ऑस्करमध्येही लोक स्वतःला नाचण्यापासून रोखू शकली नाहीत. एसएस राजामौली, एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना नमन, असे ते म्हणाले.

 

Congratulations… RRR Team winning 95th Academy OSCAR Award in Best original song category for Natu..Natu song. #indianmovies #oscarawards2023 #natunatusong #95academy pic.twitter.com/Myddsv5AuX

— RAJNIKANTA B SWAIN (@RKswainRourkela) March 13, 2023

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

#NatuNatu from RRR wins #Oscar for Best original song . Proud moment for every Indian 🙏🇮🇳#Oscars2023 pic.twitter.com/omTQk2qOwP

— Kusum Sharma (@KusumSharma07) March 13, 2023

 

 

एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही मोहर उमटवली होती. ‘बाहुबली’नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने देश-विदेशात बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. नाटू नाटू गाणे गाणे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले. कला भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी लिहिले आहे.

शेवटी तो दिवस आला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. 95 व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 ला सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या या अवॉर्ड शोचा हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सिनेतारे शॅम्पेन (रेड) कार्पेटवर शोभून दिसत आहेत. या सोहळ्यामध्ये स्टार्स त्यांच्या उत्कृष्ट आणि फॅशनेबल लूकमध्ये दिसत आहेत.

 

भारताला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे द एलिफन्ट व्हिस्परर्स या शॉर्ट फिल्मसाठीही भारताला ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताच्या ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ या लघुपटाने आज ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. त्यावर या लघुपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोंजावलेज यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘हा पुरस्कार माझ्या मातृभूमीला समर्पित आहे, मी आज येथे आपल्या आणि नैसर्गिक जगाच्या खास संबंधांवर बोलण्यासाठी उभी आहे, आदिवासी आणि प्राणी यांच्यावर प्रकाश टाकणाऱ्या आमच्या माहितीपटाला पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद,’ असे कार्तिकी यांनी म्हटले.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #Triumph #Indian #Cinema #NatuNatu #AnandMahindra #won #two #awards #India #same #Oscars #ceremony, #भारतीय #सिनेमा #विजय #भारत #एकाच #ऑस्कर #पुरस्कार #सोहळा #दोन #पुरस्कार #नाटूनाटू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमिर खानने केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
Next Article रामदास आठवलेंनी ‘सुदर्शन चक्र’ सोडले, शिंदे – फडणवीस यांचे टेन्शन वाढले

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?