● इच्छाशक्तीचा श्रीफळ फोडला, कार्यकर्त्यांचाही लागला ‘लळा’
• सोलापूर / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील रिपब्लिकन पक्षाचे मातब्बर नेते- शीघ्र कवी तथा केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी अचानक राज्याच्या दौऱ्यावर येवून राजकीय सुदर्शन चक्र सोडले. Ramdas Athawale leaves ‘Sudarshan Chakra’, Eknath Shinde – Devendra Fadnavis tension rises Political त्यामुळे भल्या भल्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत, शिवाय शिंदे-फडणवीस सरकारचे टेन्शनही वाढले.
रामदास आठवलेंना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यांनी स्वतः ही निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी आपली राजकीय माया पुन्हा एकदा शिर्डीवर बोलून दाखवली तसेच इतके दिवस आपण सत्ता उपभोगली. आता कार्यकर्त्यांनाही सत्तेची पदे मिळायला हवीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात लोकसभेला ३, विधानसभेला १५ जागांसह काही महामंडळे भाजप-शिवसेनेने (शिंदे गट) द्यावीत, अशी डिमांडही त्यांनी केली आहे.
राज्याच्या राजकारणात आठवलेंची मोठी ताकत आहे. त्यांना मानणारा मोठा वर्गही आहे. मनात आले तर ते सत्तेची गणिते पालटू शकतात. त्यांची ताकत लक्षात घेवून भाजप श्रेष्ठींनी त्यांना जवळ केलेच शिवाय देशात आणि राज्याच्या राजकारणात त्यांचा फायदा घेतला, हा इतिहास कुणीच नाकारू शकणार नाहीत. त्याची बक्षिसी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राज्यसभेवर घेवून केंद्रीय मंत्रीपदही दिले. राजकीय महत्वाकांक्षा कधी संपत नसते. त्याला आठवले हे कसे अपवाद असू शकतात ? त्यांना आगामी निवडणुका खुणावत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रविवारी शिर्डीच्या दौऱ्यावर आल्यानंतर आठवलेंनी प्रेस घेतली. नेहमीसारखीच ही प्रेस असेल, असे पत्रकारांना वाटले होते. परंतु आठवलेंनी राजकीय सुदर्शन चक्र फिरवून पत्रकारांनाही चकीत करून सोडले. पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन, असे आठवले म्हणाले.
शिर्डीत रिपब्लिकन पक्षाचे भव्य अधिवेशन होणार असून मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. नागालँड सारख्या प्रदेशात रिपाईंचे आमदार निवडून आलेत. महाराष्ट्रात का निवडून येऊ शकत नाही यावर विचार मंथन होणार आहे. मला एकट्याला मंत्री करून मी समाधानी नाही. पक्षातील इतरांनाही संधी मिळावी. दोन ते तीन महामंडळे मिळावी, असा प्रस्ताव सरकार पुढे ठेवला असल्याचे आठवलेंनी सांगितले. मंत्रीमंडळ विस्तार लवकरात लवकर व्हावा. आरपीआयला एक मंत्रीपद दिले जावे. राज्यपाल नियुक्त आमदारात आरपीआयला एक जागा मिळावी. महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर निवडून येणे अशक्य आहे. मित्र पक्षाने आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
● सरकार व खासदाराची डोकेदुखी वाढली
अर्थसंकल्प मांडल्यानंतर शिंदे – फडणवीस हे राज्याचा दौरा करत असून आपल्या सरकारने उत्तम बजेट मांडल्याचा आनंद ते व्यक्त करत असतानाच आठवलेंच्या या मागणीने अचानक दोघांचेही टेन्शन वाढले. केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे तसेच राज्यात भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट) यांची युती असून खासदार लोखंडे युतीकडून विद्यमान खासदार आहे.
आठवलेंच्या जागांच्या मागणीने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आठवलेंच्या इच्छेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचीही डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.
○ राज यांना डिवचले, ठाकरे – राऊतांना दिले टोले
राज ठाकरे यांचे फडणवीस आणि शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. मात्र राज यांची आमच्या युतीला गरज नाही असे म्हणून आठवलेंनी राज यांना डिवचले. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेकदा एकाच मंचावर दिसले आहेत. या तिघांचेही परस्पर संबंध खूप चांगले आहेत.
महापालिका निवडणुका तिन्ही पक्ष सोबत लढणार असल्याचीही चर्चा आहे. अशात आता आठवलेंच्या वक्तव्यामुळे युतीतही बिघाडी होते की काय? हे येत्या काळात पहायला मिळेल. शिवसेनेत जी उभी फूट पडली. त्या फुटीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते जबाबदार आहेत.. त्यांनी आमची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला.