मोहोळ : रस्ता ओलांडताना मालट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात मोहोळ येथील भांडी व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. 12) रात्री १०. ४५ वाजता सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरानजीक असलेल्या नरखेड पुलाजवळ झाली. Hit by a truck while crossing the road; Death of a merchant; The Jain community is suffering
राजेंद्र पमुलाल उपाध्ये (वय ५५ रा समर्थ नगर मोहोळ) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, जैन समाजाचा महत्त्वाचा असा महावीर जयंती सोहळा जवळ आला आहे. राजेंद्र उपाध्ये व त्यांचे सहकारी मित्र जेवण करून येत होते. उपाध्ये हे ऍक्टिवा (नंबर एम एच 13 डीएच 8068) वरून रस्ता ओलांडताना सोलापूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या मालट्रक (क्र केए 33/ बी 1219) ने उपाध्ये यांना जोराची धडक दिली.
मालट्रक अंगावरून गेल्याने उपाध्ये यांचा जागीच मृत्यू झाला. मृत उपाध्ये यांचे येथील मुख्य रस्त्यावरील आंबेडकर चौकात भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे मोहोळ येथील जैन समाजावर दुःखाचे सावट पसरले आहे. या अपघाताची फिर्याद मयताचा मुलगा प्रीतम राजेंद्र उपाध्ये (वय 30 ) यांनी पोलिसात दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 वाहनच्या धडकेने युवकाचा मृत्यू
सोलापूर : छोटा हत्ती वाहनाच्या धडकेने ३० वर्षाचा युवक गंभीर जखमी झाला. उपचाराकरिता त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान तब्बल पंधरा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी आतिश साहेबराव कुचेकर (वय-३०,रा,जय मल्हार नगर,बार्शी रोड बाळे) व त्याचा मावस भाऊ बाळ गंगाधर उर्फ गौरव कुमार तुळसे (वय-३०,रा. मेगाणे नगर बार्शी रोड,सोलापूर) असे दोघे मिळून रात्रीनऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून घराकडे चालत जात होते. मेंगाणे नगर कॅनलच्या पुढे पाठीमागून आलेल्या छोटा हत्ती वाहन क्र.एम.एच.१३.सी.यु.९५५९ या वाहनाने धडक दिल्याने यात बाळ गंगाधर गंभीर जखमी झाला.
डोक्याला जबरदस्त दुखापत झाल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तो मयत झाला.छोटा हत्ती वाहन चालकाविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून,अधिक तपास पोलीस निरीक्षक भोईटे हे करीत आहेत.
》 सरकारी कामात अडथळा ; एकावर गुन्हा दाखल
सोलापूर : तुझ्याकडे दिलेल्या अर्जाचे काय झाले? मी अर्ज दिला आहे. तू मला लेखी दे असे म्हणून मोठमोठ्याने ओरडून जावक रजिस्टर हे खाली फेकून देत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेची हकीकत अशी की,संशयित आरोपी अशोक सिद्राम सोनकांबळे (रा. मल्लिकार्जुन नगर वस्ती, सोलापूर) हे भूमी अभिलेख कार्यालय येथे आवक-जावक लिपिक असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्या अर्जाची चौकशी करण्याकरिता ११ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता गेले असताना, त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल रशीद रमजान बाणेवाले यांच्याकडे दिलेल्या अर्जाची चौकशी करत असताना हा गोंधळ झाला.
फिर्यादीस शिवीगाळा करून तुला बघून घेतो, तुझ्यावर खोटी केस करतो. असे म्हणून शर्टाची गच्ची धरून अंगावर हात उगारला.अशा आशयाची फिर्याद बाणेवाले यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक माळी हे करत आहेत.