□ एकाच दिवशी आढळले ८ रूग्ण
सोलापूर : कोरोना काही प्रमाणात संपला असला तरी अद्यापही त्याचे रुग्ण महाराष्ट्रासह देशात आढळत आहेत. आज सोलापुरात एकाच दिवशी 8 रूग्ण आढळून आले आहेत. तसेच, सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालात शहरातील एका 80 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. One died in Solapur due to Corona; The number of patients has increased to 15 municipal strike employees
सध्या सोलापुरातील कोरोना रूग्णांची संख्या 15 झाली आहे. सोमवारी 126 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. सोलापूर शहरात एकाच दिवशी ८ रूग्ण आढळून आले. दरम्यान, शहरातील एका ८० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे. सध्या सोलापुरातील कोरोना रूग्णांची संख्या १५ इतकी झाली आहे.
सोमवारी १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्ट ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापुरात 20 हजार कर्मचारी संपावर
राज्यात जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. या संपात सोलापूर शहर व जिल्ह्यातील सुमारे 20 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे सोलापुरात प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिक्षण, आरोग्य, महसूल, कृषी आदी बहुतांशी सेवांवर संपाचा मोठा परिणाम झाला आहे. दुपारी सरकारी व निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
○ महापालिकेतील 42 टक्के कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग; 3412 पैकी 1956 कर्मचारी कामावर हजर !
आज मंगळवारच्या राज्यव्यापी संपामध्ये सोलापूर महापालिकेतील एकूण 3 हजार 412 कर्मचाऱ्यांपैकी 1 हजार 456 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. केवळ 42 टक्के कर्मचारी हे या संपात सहभागी झाले होते तर उर्वरित 58 टक्के कर्मचारी हे कामावर हजर असल्याचे दिसून आले. काही कर्मचारी इतर कारणास्तवही गैरहजर असू शकतात.
○ शासन निर्देशानुसार गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई : भगत
सोलापूर महापालिकेतील विविध विभागात असलेले एकूण 1 हजार 956 कर्मचारी हे महापालिकेत कामावर हजर होते तर विविध विभागातील 1 हजार 456 कर्मचारी हे गैरहजर होते. शासन निर्देशानुसार कामावर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांनी दिली.
○ घनकचरा विभागाकडील 55 टक्के कर्मचारी गैरहजर : घोलप
महापालिकेकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील एकूण 1746 कर्मचाऱ्यांपैकी 977 म्हणजे 55 टक्के कर्मचारी हे आज गैरहजर होते. यामध्ये सफाई कामगार, झाडूवाली, बिगारी कामगार, जमादार, एसआय यांचा समावेश आहे. गैरहजर कर्मचाऱ्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार स्वच्छतेची कामे करण्यात आले आहेत, असे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले.
○ घंटागाड्यांचे कामकाज सुरूच
सोलापूर शहरात घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्याचे कामकाज सुरूच होते. या घंटागडांचा मक्ता खाजगीकरणामुळे मक्तेदाराला दिला आहे. कंत्राट पद्धतीवर हे कर्मचारी कार्यरत असल्याने घंटागाड्या पूर्वत सुरूच होत्या. संपाचा या विभागावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.