》 सहाय्यक उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी स्वप्नील सोलंकर यांच्याकडे
सोलापूर : महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता असलेले विभागीय अधिकारी प्रकाश दिवाणजी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे तर सहाय्यक उद्यान अधीक्षक पदावर पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलंकर यांची नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी तसे आदेश काढले आहेत. Park Department Superintendent Now Zonal Officer Dewanji Assistant Park Superintendent Solapur Municipality
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी या विभागातील दोन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत उद्यान अधीक्षक पदाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता असलेले विभागीय अधिकारी प्रकाश दिवाणजी यांच्याकडे तर सहाय्यक उद्यान अधीक्षक पदावर पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलंकर यांची नियुक्ती केली आहे. यामुळे मानधनावर काम करणाऱ्या विविध पदावरील अधिकाऱ्यांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या १२ वर्षापासून महापालिकेच्या उद्यान विभागात मानधनावरच सलग सेवा बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर महापालिका प्रशासनाने या विभागासाठी उद्यान अधीक्षक आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक या पदासाठी मुलाखती घेऊन अधिकाऱ्यांची मानधनावर नेमणूक करण्यात आली होती.
मात्र यानंतर प्रथमच उद्यान विभागातील कामकाजा संदर्भात सततच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. याशिवाय घेतलेल्या अधिकाऱ्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने याकडे महापालिका आयुक्तांनी अधिक लक्ष केंद्रित केले होते. आयुक्तांनी उद्यान विभागातील नियुक्त केलेल्या उद्यान अधीक्षक आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक या मानधन पदावरील अधिकाऱ्यांची कराराप्रमाणे मुदत संपल्याने त्यांना पुन्हा मुदतवाढ न देता त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
सोलापूर शहरातील महापालिकेच्या उद्यानांची देखरेख, पुतळा परिसर उद्याने आणि मुख्य रस्त्यांवरील दुभाजकामधील सुशोभीकरण व्यवस्थित व्हावे या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी उद्यान विभागाच्या रिक्त असलेल्या अधीक्षक पदावर कनिष्ठ अभियंता तथा विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे विभागीय अधिकारी प्रकाश दिवाणजी आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक पदावर पर्यावरण व्यवस्थापक स्वप्निल सोलंकर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत तब्बल २२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने शहरात प्रदूषणमुक्त विविध उपायोजनांसाठी विविध कामे हाती घेण्यात येणार असून या अधिकाऱ्यांची मदत होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 17, आज तीन रुग्ण आढळले
सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात कोरोना बाधित असलेल्यांची संख्या १७ आहे. आजच्या अहवालाला तिघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
मंगळवारी ६१ रूग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यात तिघे जण पॉझिटिव्ह आढळून आले तर ५८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नई जिंदगी नागरी आरोग्य केंद्राच्या हद्दीतील दोन तर दाराशा हॉस्पीटलच्या हद्दीतील एक रूग्ण आहेत.
कोरोना काही प्रमाणात संपला असला तरी अद्यापही त्याचे रुग्ण महाराष्ट्रासह देशात आढळत आहेत. आज सोलापुरात काल एकाच दिवशी 8 रूग्ण आढळून आले आहेत. तसेच, सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालात शहरातील एका 80 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद काल झाली आहे.
सोमवारी १२६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचे २८ तर आरटीपीसीआर टेस्ट ९८ जण होते. त्यापैकी ११८ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष तर ५ महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, सध्या १७ रूग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत सोलापूर शहरात कोरोना बाधित असलेले रूग्ण ३४ हजार ५७२ तर आजपर्यंतची मृतांची संख्या १५१७ वर पोहोचली आहे. रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३३ हजार ३८ एवढी आहे.
सध्या शहरात कोरोना रूग्ण वाढत असल्याने महापालिकेच्या आराेग्य विभागाने आवश्यक त्या सेवासुविधा सज्ज ठेवल्या आहेत. शिवाय शासकीय रूग्णालयानेही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून ठेवली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, सर्दी, ताप, खोकला व इतर आजारांची लक्षणे दिसून आल्यास संबंधित नजीकच्या डॉक्टरांना भेटून औषधोपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.