सोलापूर : शेतकरी प्रश्नांसाठी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधावे म्हणून आपण आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलीस प्रशासनाने आपल्याला भेट घालून देतो अशी, फसवणूक करून बोलवले आणि तिथे सरकारी कामात अडथळा आणला असा कांगावा उभा केला आहे, असा आरोप जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी केला आहे. Change the Guardian Minister of Solapur… otherwise Prabhakar Deshmukh Janhit Farmers Association will protest at Azad Maidan
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आणि पालकमंत्र्यांना तातडीने बदलले न गेल्यास आपण आता थेट मुंबईत आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जनहित
संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हे आरोप केले.
आ. सचिन कल्याणशेट्टी यांना वगळून कोणाही भाजप आमदाराला सोलापूरचे पालकमंत्री पद द्या पण विखे पाटील यांच्याकडून येत्या पंधरा दिवसात पालकमंत्री पद काढून घ्या. त्यांना सोलापूरला यायला वेळ नाही. आले तर शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकणं जड जाते असा पालकमंत्री काय कामाचा? असा सवालही देशमुख यांनी केला. आपण या सर्व प्रश्नी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आता थेट मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहोत असेही देशमुख यांनी जाहीर केले.
प्रभाकर देशमुख म्हणाले, शासकीय कामात अथडळा आणल्याप्रकरणी देशमुख यांच्यासह सात जणांना विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . तब्बल तेरा दिवसानंतर देशमुखी यांची जामीनावर सुटका झाली आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, दोनशे रुपयांचा फुलाचा हार परवडत नाही म्हणून आपण दोन रुपये किलो कांद्याचा हार बनवला. पालकमंत्र्यांना कांद्याचा पडलेला भाव याकडे लक्ष वेधण्यासाठी तो देणार होतो, समृद्धी महामार्गावर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार त्यांना मातीमोल किंमत मिळत आहे, हे प्रश्न आपण मांडणार होतो.
पण पोलिसांनी आपल्याला आंदोलन करू नका, भेट घालून देतो असे सांगून बोलावले आणि गेल्यानंतर पालकमंत्र्यांनी आमच्याकडे बघितलेच नाही. अधिकाऱ्यांनी भेट घालून दिली नाही. तेव्हा आम्ही घोषणाबाजी केली. पोलिसांनी जबरदस्तीने आपल्याला ताब्यात घेतले, दंडेलशाही केली, असेही
देशमुख म्हणाले. आमच्यावर खोटी कलम लावणाऱ्या उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक आयुक्त माधव रेड्डी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे राघवेंद्र क्षीरसागर या तिघांवर गृहमंत्र्यांनी निलंबनाची कारवाई करावी, आज शाई आणली म्हणाले, उद्या बॉम्ब आणला असा खोटा बनाव ही करतील. शेतकऱ्यांसाठी झगडणे गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले या अधिकाऱ्यांनी आपल्याला शिव्या दिल्या. अशी दमबाजीही केली, असा आरोपही केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 भाजप नगरसेवकाची जतमध्ये भरदिवसा हत्या; मुलांना शाळेतून आणायला जाताना गोळ्या झाडून संपवले
सांगली : सांगलीत नगरसेवकाच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञात आरोपींनी कारवर हल्ला चढवला होता. विजय ताड यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जत तालुक्यातील सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूलजवळ भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
विजय शिवराज ताड यांच्या वाहनावर सुरुवातीला गोळीबार झाला. त्यानंतर ते गाडीतून निसटून पळण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि डोक्यात दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. भाजप नगरसेवक ताड यांच्या हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. इनोव्हा गाडीतून जात असताना हल्लेखोरांनी गाठले. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. नगरसेवक ताड हे आपल्या इनोव्हा गाडीतून सांगोला रोडवर असणाऱ्या अल्फान्सो स्कूल येथे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. अल्फान्सो स्कूलच्या जवळ पोहोचले असता ताड यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची इनोव्हा गाडी अडवली. त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर थेट गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात ताड जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे जत शहरासह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरुन केला आहे, हे मात्र – अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. तसेच ताड समर्थकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील जतकडे रवाना झाले आहेत.