सोलापूर : येत्या मार्च महिना अखेरपर्यंत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली. By the end of March, the Ujni Solapur parallel water channel issue will be sorted out by the Municipal Corporation
पहिला मक्तेदार पोचमपाड कन्ट्रक्शन कंपनी लवादा मध्ये गेले आहेत. पुणे येथे लावादाची प्रक्रिया सुरु आहे. पोचमपाड कंपनीने लवाद साठे यांच्याकडे दि. 24 जानेवारी 2023 रोजीच्या पत्राद्वारे यामध्ये दुसरा मक्तेदार लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (कोल्हापूर ) यांना प्रतिवादी (रिस्पॉडन्ट) म्हणून मान्यता देण्यास विनंती केली आहे.
आता स्मार्ट सिटी कंपनी, पहिला मक्तेदार पोचमपाड कंपनी आणि सध्याचा मक्तेदार लक्ष्मी कंपनी या तिघांमध्ये चर्चेअंती निर्णय होईल. यामुळे येत्या मार्च महिना अखेरीपर्यंत उजनी- दुहेरी जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सोलापूर ते उजनी दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भात पोचमपाड” कन्ट्रक्शन कंपनीने लवादाकडे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (कोल्हापूर ) ला प्रतिवादी करण्याची विनंती केली असून त्या संदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरिता अनुभवी सॉलिसिटर यांचा अभिप्राय घ्यावा तसेच तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे – पाटील यांच्यावर मंत्रालय स्तरावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री विखे – पाटील यांनी दिले होते.
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी चे काम अचानकपणे 24 नोव्हेंबर पासून बंद करण्याचे आदेश तत्कालीन सीईओ त्र्यंबक ढेंगळे – पाटील यांनी दिले होते. यामुळे शहरवासीयांबरोबरच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. विधानसभेत या संदर्भात आमदारांनी आवाज उठविला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिका आयुक्तांची माहिती
सोलापूर : वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराला 20 मार्चपासून आता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दिली.
मागील आठ दिवसात अवकाळी पाऊस, वारा इत्यादि कारणाने नदीतून / धरणातून कच्चे पाणी उपसा क्षमतेपेक्षा कमी होत असल्याने शहरातील नागरीकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे. वादळी पावसामुळे टाकळी, उजनी, सोरेगांव, पाकळी इत्यादि पंपींग स्टेशनवरील विद्युत पुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठयात विस्कळीतपणा आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात पुढील दिवसात चार दिवसाआड पाणीपुरवठा करणे आवश्यक ठरणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत दि. २० मार्च २०२३ रोजी पासून शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
सोलापूर शहराला पुढील दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल. तरी नागरीकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.