सोलापूर : तुळजापूर – सोलापूर महामार्गावर तामलवाडी जवळ तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. Horrific accident of a sightseeing car; 3 devotees died Tamalwadi Tuljapur Solapur Nashik यामध्ये 3 भाविकांचा मृत्यू तर 3 भाविक जखमी झाले आहेत. निखिल सानप, अनिकेत भाबड आणि अथर्व खैरनार असे मृत भाविकांचे नाव आहे. जखमींवर सोलापूरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, भरधाव असलेल्या कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.
सोलापूर – तुळजापूर रस्त्यावरील कटारे फिलिंग मिलजवळ बोलेरो वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील तीन जण जागीच ठार झाले. तर पाचजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 21) सकाळी सातच्या सुमारास घडली. वाहनातील सर्वजण तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.
अपघातानंतर तीन जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोघांवर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
निखिल रामदास सानप (वय २१, रा. चास, ता. सिन्नर जि. नाशिक), अनिकेत बाळासाहेब भाबड (वय २२, रा – चास ता. सिन्नर, जि. नाशिक), अथर्व शशिकांत खैरनार (वय- २२, चास, ता सिन्नर जि. नाशिक ) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर गणेश नामदेव खैरनार (वय ३२), पंकज रवींद्र खैरनार (वय ३०), जीवन सुदीप ढाकणे (वय २५), तुषार बिडकर (वय २२), दीपक बिडकर (वय २४, रा. चास, ता. सिन्नर जि.नाशिक) अशी पाच जखमींची नावे आहेत.
यातील जखमी तसेच मृत पावलेले तरुण मंगळवारी सकाळी तुळजापूरला ( एम. एच. १५ इ.एक्स. ३२ ११ ) या बोलेरो वाहनातून तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सातच्या सुमारास सोलापूर- तुळजापूरच्या सीमेवर असलेल्या कटारे स्पिनिंग मिलजवळ आली. त्यावेळी वेगात असलेल्या वाहनाचे टायर फुटल्याने ती पलटी होऊन तिघे मृत्यू पावले. तर तिघे जखमी झाले. जखमींना तातडीने तामलवाडी टोल नाक्यावरील रुग्णवाहिकेच्या सहाय्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केली असता वरील तिघे उपचारापूर्वीच मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर तिघांवर उपचार सुरू आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी
लग्नाचे आमिष दाखवून सोलापूरहून नेले औरंगाबादला नेले पळवून
सोलापूर : एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश व्ही.पी. आव्हाड यांनी ठोठावली.
दीपक उर्फ बादल दिलीप पवार (वय २५) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. दीपक याने फिर्यादीची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील तिला तिच्या घरातून जबरदस्तीने दुचाकीवरून लग्न करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. त्यानंतर तिला औरंगाबाद येथे नेले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारिरीक व लैंगिक अत्याचार केले. म्हणून पिडीतेच्या आईने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भाबड यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र पाठविले होते. कोर्ट पैरवीं म्हणून पोलीस अंमलदार रुपनर यांनी काम पाहिले.
हे प्रकरण विशेष न्यायाधीश आव्हाड यांच्या समोर चालले. यात सरकारपक्षातर्फे एकूण ८ व बचाव पक्षातर्फे २ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पिडीता, फिर्यादी, तपास अधिकारी तसेच डॉक्टरांची साक्ष व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी दिपक पवार यास अत्याचारप्रकरणी दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व १६ हजारांचा दंड ठोठावला. तर आरोपीला मदत करणाऱ्या माणिक चव्हाण व वर्षा काळे या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यात सरकारतर्फे अॅड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे अॅड. सुरेश पाटील – कुरुलकर यांनी काम पाहिले.