Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्कलकोट । वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्कलकोट । वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा

Surajya Digital
Last updated: 2023/03/23 at 7:58 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
● स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमले, हजारो स्वामीभक्त स्वामी चरणी नतमस्तकस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)वटवृक्ष मंदिरासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

● स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमले, हजारो स्वामीभक्त स्वामी चरणी नतमस्तक

 

अक्कलकोट : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला. Akkalkot. Manifestation day ceremony of Samartha celebrated with devotion at vat Vriksha Temple

 

आज गुरूवारी ( दि.२३) स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणे करिता सर्व स्वामी भक्तांना दुतर्फा रांगेतून दर्शनास सोडण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन व नामस्मरण सोहळा, त्यानंतर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींच्या पाळण्यातील मुर्तीवर गुलाल पुष्प वाहून पाळणा गीतांनी श्रीं चा पाळणा कार्यक्रम संपन्न झाला.

 

यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळेंच्या हस्ते, मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या वतीने श्रींची आरती संपन्न होवून भजनगीत, पाळणा व आरतीने स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात संपन्न झाला. स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. मंदीरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानाच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी – गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन प्रसाद ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

वटवृक्ष मंदिरासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

 

भाविकांनी स्वामी दर्शन व भोजन महाप्रसादाची तृप्ती अनुभवल्यानंतर दुपारी स्वामी प्रकट दिनानिमित्त देवस्थान रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. देवस्थानच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला. आज गुरुवार व स्वामींचा प्रकट दिन असा दुग्ध शर्करा योग साधून आलेला स्वामींच्या प्रकट दिन दिवशी दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. आज प्रकट दिनानिमित्त रात्रीची शेजारती व दर गुरुवारी होणारा मंदिरातील पालखी सोहळा झाला नाही.

श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सालाबादाप्रमाणे पार पडणाऱ्या नगरप्रदक्षिणा-प्रभात फेरीस आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी पहाटे काकड आरती पूर्वी सुरुवात झाली.

 

माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थाचे मालोजीराजे भोसले राजेसाहेब व कुटूंबीय, धर्मादाय आयुक्त मुख्य कार्यालय मुंबईचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त मनीषा पाटील, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

 

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत असलेल्या मोकळ्या परिसरात भव्य कापडी मंडप उभारण्यात आले होते. ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली होती. त्यामुळे प्रचंड गर्दीमध्ये सुद्धा भाविकांना मंडपामुळे उन्हाचा त्रास जाणवला नाही. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरुप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख,
रामचंद्र समाणे, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रवि मलवे, शंकर पवार, अरविंद कोकाटे, सचिन पवार, बसवराज आलमद, सातलिंगप्पा आलमद, लखन गवळी, श्रीकांत मलवे, सुरेखा तेली, कौशल्या जाजू, कृष्णाबाई घाटगे, पूजा साळुंखे, श्रावणी पवार, सुवर्णा जाधव, कल्याणी पाटील, प्रेरणा कासेगावकर, सीमा देगावकर, आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #Akkalkot #Manifestation #day #ceremony #Samartha #celebrated #devotion #vatVriksha #Temple, #अक्कलकोट #वटवृक्ष #मंदिर #समर्थ #प्रकटदिन #सोहळा #भक्तीभाव #साजरा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास, लगेच जामीन पण खासदारकी धोक्यात
Next Article अक्कलकोट । शेतकऱ्याची कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?