मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांच्या गाडीवर ट्रक धडकावण्याचा व अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली आहे. परंतु मोहोळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत दाखल झाला नव्हता. मात्र घटनेनंतर बारसकर यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. Attempted to cause an accident to NCP’s Ramesh Barskar’s car, demanded police protection Mohol Solapur
याबाबत बारस्कर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते एम. जी. ग्लोस्टर गाडी क्र. एम. एच. ४२ / बी. बी. १९२० या गाडीतून बी.बी. मोहोळकडे येत होते. ड्रायव्हर ईशान मच्छिंद्र खरकदारी हा गाडी चालवीत होता. त्यांचा पर्सनल स्वीय सहायक शीलवंत गुणवंत क्षीरसागर हाही त्या गाडीत होता. सोलापूर येथील पक्षाची कामे करून बारसकर सोलापूर- मोहोळ हायवे रोडने मोहोळकडे येत होते. ते ड्रायव्हरच्या बाजूच्या शीटवर बसले होते.
त्यांचे वाहन वाहन सावळेश्वर टोलनाका येथे आल्यावर पाठीमागून एक कर्नाटक पासींगची ट्रकचा चालक (के. के. ए. ५६-१३१५) हा ओव्हरटेक करीत, भरधाव वेगात आला आणि बारसकर यांच्या गाडीस धडकण्याचा व अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.
परंतु चालक ईशान खरकदारी यांनी गाडी थोड्या अंतरावर थांबवली. टोलनाक्या वरील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहून ट्रक चालकास त्याचे टूक मधून खाली उतरवून, त्याचा ट्रक साईडला लावला. त्या ट्रक ड्रायव्हरला मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव शांतलिंगेश्वर बाबूराव ढाले (रा. नांदगाव ता. तुळजापूर जि.धाराशिव) आहे.
• ट्रक ड्रायव्हरची चौकशी व्हावी : बारसकर
मी एका पार्टीचा लिडर असल्यामुळे जाणून बुजून अंगावर गाडी घालण्याचे कृत्य केले असावे असा मला दाट संशय आहे. म्हणून त्यांनी याबाबत त्या ट्रक ड्रायव्हरची चौकशी व्हावी व स्वरक्षण मिळावे अशी मागणी रमेश बारसकर यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील याच्या बंगल्यात चोरी
मोहोळ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या मोहोळ येथील सावली बंगल्यातून दीड लाखाचे प्लबिंगचे साहित्य चोरीस गेले याबाबत २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकामधून जाणा-या जुन्या ढोकबाभुळगाव रस्त्याच्या लगत वेअर हाऊससमोर उमेश सुरेश पाटील यांचा सावली बंगला आहे.
या बंगल्याचे बांधकाम चालू आहे, त्याकरीता प्लंबींगचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयाचे साहित्य आणून बांधकाम चालु असलेल्या बंगल्यात ठेवले होते. बंगल्याचे काम चालू असल्याने त्याला दरवाजे लावलेले नव्हते. दि.१५ डिसेंबर रोजी प्लंबर खांडेकर याच्याकडे कामाबाबत विचारले असता तो म्हणाला की, बॉक्समध्ये नविन आणुन ठेवलेले प्लबिंगचे सामान दिसुन येत नाही, असे सांगितल्याने सगळे बॉक्स उघडुन पाहिले असता सर्व बॉक्स रिकामे आढळुन आले.
यापूर्वी प्लॅबिगचे काम करणारे ओमप्रकाश राणाराम सुतार (रा. खारा ता-फलोदी जि. जोधपुर राज्य-राज्यस्थान) व प्रकाशचंद कनीराम सुतार ( कामगार दोघे रा. रा. जालोडा ता. फलोदी. जि.जोधपुर राज्य, राज्यस्थान) व त्यांचे साथीदार हे आम्हाला न विचारता गावाकडे निघुन गेले होते.
दरम्यान ते दि. २६ मार्च रोजी बंगल्यावर देखभालीचे काम करीत असताना वरील त्यांचे साथीदारापैकी ओमप्रकाश राणाराम सुतार, प्रकाशचंद कनीराम सुतार हे दोघे गावाकडून बंगल्यावर त्यांचे मशिनरी सुतार काम करण्याचे साहित्य घेवुन जाणेसाठी आले होते. आम्ही त्यांना सदर प्लबिंग साहित्याबाबत विचारपुस करता ते काही एक सांगत नाहीत यावरुन सदरचे प्लबिंगचे साहित्य वरील दोघे व त्यांचे साथीदार मालकाच्या सहमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद उमेश पाटील यांचे खाजगी पी.ए प्रमोद आतकरे यांनी दिली आहे. अधिक तपास या घटनेचा पो. ना उपासे करीत आहेत.