सोलापूर – सात हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आल्यावर तलाठ्यानं पैसे घेऊन चार चाकी वाहनातून धूम ठोकली. Realizing that he was trapped, Talatha took the money and knocked on the Solapur Mangalvedha district office
मंगळवेढा प्रांत कार्यालयात हायवेच्या भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पाहणाऱ्या तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने ७ हजार रुपयांची लाच घेतली असून त्याने लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फिल्मी स्टाईलने धूम ठोकली. खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण यास एसीबीने गजाआड केले आहे. याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
लाचलुचपत अधिकाऱ्यांना अखेर तलाठ्याचा साथीदार खाजगी व्यक्तीस ताब्यात घ्यावं लागलं. हा प्रकार काल सायंकाळी मंगळवेढा हद्दीत घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राच्या शेतीमधून राष्ट्रीय महामार्ग सांगली – सोलापूर जात आहे. यात शेत जमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित होत आहे. याचे नुकसान १ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहे पण मंजुरी दाखला देण्यासाठी तलाठ्यानं मध्यस्ताच्या माध्यमातून सात हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारत असताना तलाठ्याला आपण सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आलं. तेव्हा त्यानं ७००० ची रक्कम घेऊन स्वतःच्या चार चाकी गाडीतून तातडीने पोबारा केला.
लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तलाठी सुरज रंगनाथ नळे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा यांच्या कार्यालय आणि घराजवळ सापळा लावला. मात्र सुरज नळे हे संबंधितांना पाहून तेथून वेगाने निघून गेले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण याला त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं आहे. उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने हा सापळा लावला होता. तलाठ्याचा शोध सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
सोलापूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दीड वर्षांपासून अत्याचार करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी नईम शेख (रा.सोलापूर) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे. आरोपी नईम याने पीडितेशी जवळीकता साधत तिची ओळख वाढवली. त्यानंतर तिला घरात कोणी नसताना घरी बोलावून मागील दीड वर्षांपासून अनेक वेळा अत्याचार केला.
काही दिवसानंतर पीडिता ही गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने आपल्या आई वडिलांना सांगितली नाही. एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नुकतेच पीडितेने मुलीला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास पोलिस करत आहेत.