सोलापूर : श्री राम नवमी सुट्टी दिवशीही गुरुवारी महापालिका तिजोरीत मालमत्ता कराचा एकूण 52 लाख 6 हजार 392 रुपये भरणा झाला आहे. Even on the holiday of Shri Ramnavami, payment of property tax of Rs 52 lakh, Solapur municipal water supply smooth MLA demand
आज गुरुवारी सुट्टी दिवशीही महापालिकेचे कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर वसुलीही करण्यात आली. आज दिवसभरात महापालिका मालमत्ता कर विभागाच्या शहरांतर्गत 23 लाख 39 हजार 738 रुपये कर भरणा झाला आहे. हद्दवाढ – 25 लाख 63 हजार 667 रुपये तर गवसु विभागमध्ये तीन लाख 2 हजार 987 रुपये कर वसूल झाला आहे. तिन्ही विभागाअंतर्गत एकूण
52 लाख 6 हजार 392 कर भरणा झाला आहे.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर वसुली व सील कारवाई सुरूच आहे. मिळकतदारांनी आपली थकबाकी भरून कटू कारवाई टाळावी आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा
– आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मनपा आयुक्तांना सूचना
सोलापूर : सोलापूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत होत आहे. सकाळच्या ठिकाणी संध्याकाळी तर संध्याकाळच्या ठिकाणी रात्री पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या येत आहेत. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना दिल्या.
यावेळी आयुक्तांनी गेल्या काही दिवसांपूर्वी असल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता मात्र आता लवकरच सुरळीत होईल असे सांगितले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांचीही भेट घेऊन पाण्यासंदर्भात चर्चा केली.
○ माने समर्थकांचाही पाठपुरावा
दुहेरी जलवाहिनीसाठी माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांनाही पाठपुरावा सुरू केला आहे. शिवाजी घोडके, पाटील यांनी महापालिकेत येऊन पाण्यासंदर्भात आणि दुहेरी जलवाहिनीचे काम कुठपर्यंत आले आहे याची माहिती घेतली. पाण्यावाचून शहरवासियांना हाल सोसावा लागत आहे. आता उन्हाळ्यात शहरवासियांची पाण्याची मागणी वाढली असता हा पाणीटंचाई निर्माण झालीय. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती पाहता पुढील दोन महिन्याच्या कडक उन्हाळ्यात प्रशासनाची कसोटी लागणार आहे.