Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरोपीच्या नावाचा दुसराच माणूस पोलीस ठाण्यात हजर; रमेश बारसकर अपघात प्रकरणाला लागले वेगळेच वळण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आरोपीच्या नावाचा दुसराच माणूस पोलीस ठाण्यात हजर; रमेश बारसकर अपघात प्रकरणाला लागले वेगळेच वळण

Surajya Digital
Last updated: 2023/03/31 at 4:21 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मोहोळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांच्या गाडीला अपघात करणारा ड्रायव्हरच्या नावाचा दुसरा माणूस मोहोळ पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला. त्यामुळे मोहोळ पोलिसांची आता डोकेदुखी वाढली आहे. Another person with the name of the accused appeared in the police station; Ramesh Baraskar accident case took a different turn Talathi bribe Solapur Mohol Mangalvedha

Contents
रमेश बारसकर यांच्या म्हणण्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्यास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तलाठ्याने पैसे घेऊन ठोकली धूम

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर हे सोलापूरहून मोहोळकडे येत असताना सावळेश्वर टोळ नाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न झाला. त्या ट्रक डायव्हरला मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने त्याचे नाव शांतलिंगेश्वर बाबूराव ढाले (रा. नांदगाव, ता. तुळजापूर) असे सांगितले होते व त्याच्यावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही घटना २७ मार्च रोजी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सावळेश्वर टोलनाक्या जवळ घडली होती.

 

इथपर्यंत सर्व ठीक होते. परंतु ही बातमी वाचून प्रत्यक्ष दुसरीच व्यक्ती मी शांतलिंगेश्वर बाबूराव ढाले आहे व माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, म्हणून मोहोळ पोलीस ठाण्यात हजर झाली. माझ्यावरील खोटा गुन्हा माघारी घेण्यात यावा, अशा मागणीचा अर्ज मोहोळ पोलिसांकडे दिला. त्यामुळे आता रमेश बारसकर यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला ‘तो’ शांतलिंगेश्वर ढाले कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

रमेश बारसकर यांच्या म्हणण्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

 

जर तो शांतलिंगेश्वर ढाले नसेल तर त्याने तसे नाव का सांगितले? त्याने खोटे नाव का सांगितले? हा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा नेमका उद्देश काय? बारसरकर यांना संपवण्याचा प्रकार होता की काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मोहोळ पोलीस काय भूमिका घेणार व कसा तपास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तलाठ्याने पैसे घेऊन ठोकली धूम

 

सोलापूर – सात हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आल्यावर तलाठ्यानं पैसे घेऊन चार चाकी वाहनातून धूम ठोकली.

मंगळवेढा प्रांत कार्यालयात हायवेच्या भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पाहणाऱ्या तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने ७ हजार रुपयांची लाच घेतली असून त्याने लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फिल्मी स्टाईलने धूम ठोकली. खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण यास एसीबीने गजाआड केले आहे. याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

 

लाचलुचपत अधिकाऱ्यांना अखेर तलाठ्याचा साथीदार खाजगी व्यक्तीस ताब्यात घ्यावं लागलं. हा प्रकार काल सायंकाळी मंगळवेढा हद्दीत घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राच्या शेतीमधून राष्ट्रीय महामार्ग सांगली – सोलापूर जात आहे. यात शेत जमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित होत आहे. याचे नुकसान १ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहे पण मंजुरी दाखला देण्यासाठी तलाठ्यानं मध्यस्ताच्या माध्यमातून सात हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारत असताना तलाठ्याला आपण सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आलं. तेव्हा त्यानं ७००० ची रक्कम घेऊन स्वतःच्या चार चाकी गाडीतून तातडीने पोबारा केला.

लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तलाठी सुरज रंगनाथ नळे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा यांच्या कार्यालय आणि घराजवळ सापळा लावला. मात्र सुरज नळे हे संबंधितांना पाहून तेथून वेगाने निघून गेले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण याला त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं आहे. उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने हा सापळा लावला होता. तलाठ्याचा शोध सुरू आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Anotherperson #name #accused #appeared #policestation #RameshBaraskar #accidentcase #took #different #turn #Talathi #bribe #Solapur #Mohol #Mangalvedha, #आरोपी #नाव #दुसराच #माणूस #पोलीसठाणे #हजर #रमेशबारसकर #अपघात #प्रकरण #वेगळेच #वळण #तलाठी #लाच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर बाजारात झाला दराचा वांदा, शेतकरी विकणार अनुदानावर कांदा
Next Article लाच मागितली म्हणून शेतकऱ्याने पंचायत समितीच्या कार्यालयासमोर 2 लाख उधळले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?