पंढरपूर :- चैत्री शुध्द कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी कुटुंबियासमवेत तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्या ॲड. माधवी निगडे यांनी कुटुंबीयांसमवेत केली. On the occasion of Chaitri Ekadashi, Pandhari left with the shout of ‘Hari’ Pandharpur Solapur Vitthal Rakhumai
चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा आज रविवारी (ता. 2 एप्रिल) लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पार पडला. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त यात्रा साजरी होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या वारीला मराठवाडा, कोकण, कर्नाटक येथून भाविक दरवर्षी न चुकता येतात. एकंदरीत पंढरी टाळ मृदुंग आणि हरी नामाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमून निघाली आहे.
मंदिरातील विठ्ठल गाभाऱ्याला गुलाब, झेंडू, अस्टर, सुर्यफुल, शेवंती, मोगरा अशा विविध फुलांनी सजविण्यात आले आहेत. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही आरास केली आहे. या मनमोहक आरासामुळे मंदिर उजळून निघाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल झाले आहेत.
चैत्री एकादशी निमित्त मंदिरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदीर व मंदीर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. दर्शनरांगेत मोफत खिचडी व ताक वाटप करण्यात येत आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे.
शनिवारपासूनच पंढरीत भाविकांची संख्या हळूहळू वाढू लागली होती. चंद्रभागा नदीकाठावरही गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिर समितीच्या सदस्य माधवीताई निगडे यांनी विठ्ठल्-रूक्मिणी मातेची महापूजा केली. महापूजा केल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली. विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. आज कामदा एकादशी म्हणजे धावती यात्रा असेही संबांधले जाते.