सोलापूर : शिक्षकांच्या टप्पा अनुदानाचे प्रस्ताव मंजूर करताना झालेल्या गोंधळावर ‘सुराज्य’ने जोरदार प्रहार करताच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. As soon as the phased grant work came into phase, the Secondary Education Officer made a correct program in Solapur त्यातून जिल्हा परिषद प्रशासनाचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. ‘सुराज्य’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमिक विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांचा पदभार तडकाफडकी काढून घेतला असून आता वटारे यांच्या जागी महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून शिक्षण विभागात मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचे ऐकायला मिळत आहे.
कित्येक दिवस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करून राज्यातील विनाअनुदानित शाळा आणि शिक्षकांनी टप्पा पध्दतीने अनुदान पदरात पाडून घेतले होते. त्या टप्पा अनुदानाचे प्रस्ताव मार्च अखेर मंजूर करायचे होते. सोलापूर जिल्हा परिषदेत हे काम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले.
त्यामुळे शेवटचे काही दिवस दररोज जिल्हा परिषदेमध्ये पात्र शिक्षकांची गर्दी होत होती. मार्चच्या शेवटच्या दिवशी तर शिक्षकांची वाढलेली गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मागवण्याची वेळ जिल्हा परिषदेवर आली होती. त्यावेळी ‘वजन’ ठेवल्याशिवाय कोणाचीच ‘फाईल’ पुढे सरकत नसल्याची तक्रार संबंधित शिक्षकांनी चक्क पोलिसांसमोरच बोलून दाखवली होती. त्यामुळे टप्पा अनुदानाचे प्रस्ताव मंजुरीतील वेगळाच प्रकार उघडकीस आला होता. यावर ‘सुराज्य’ने १ एप्रिलच्या अंकात प्रकार टाकला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ वटारे पुन्हा योजना शिक्षणाधिकारी
दरम्यान, वटारे यांची मूळ नेमणूक ही योजना शिक्षण विभागात योजना शिक्षणाधिकारी म्हणून आहे. त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. मात्र टप्पा अनुदान प्रक्रियेमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे वटारे ह्या यापुढे योजना योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून पूर्णवेळ कामकाज पाहणार आहेत.
● म्हणे पूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्याचे आदेश बोगस
यापूर्वी जे शिक्षक २० टक्के अनुदानास पात्र ठरले होते; ते शिक्षक यावेळी ४० टक्के अनुदानासाठी आले होते. त्यांच्या २० टक्के अनुदान मंजुरीच्या आदेशाची कागदपत्रे शिक्षण विभागात सापडत नसल्याचे सांगून पूर्वीचे आदेशच बोगस असल्याचे वटारे यांनी सांगून प्रस्ताव नाकारले. त्यामुळे आपली नोकरीच संपुष्टात येते की काय अशी भिती अशा शिक्षकांना वाटत आहे. अशा शिक्षकांच्या तक्रारीसुध्दा जि. प. प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
● जावेद शेख यांच्याकडे दिला तात्पुरता पदभार
दरम्यान, वटारे यांच्याकडील पदभार काढून तो महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रमाधिकारी जावेद शेख यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवला आहे. प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी शेख यांना सहकार्य करावे, अशी सूचना दिली असल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली..
○ शेख यांच्यावर घोट्याळ्याचा आरोप
जावेद शेख यांच्यावर महिला व बालकल्याण विभागांमध्ये लहान मुलांच्या पोषण आहारात कोट्यवर्धीचा घोटाळा केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उमेश पाटील आणि त्रिभुवन धाईंजे यांनी केला होता. टप्पा अनुदान प्रक्रियेदरम्यानही अशीच चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे अशा घोटाळ्याचे आरोप झालेल्या अधिकाऱ्याकडे शिक्षण विभागाचा पदभार गेल्याने जि.प.मध्ये चर्चेला उधाण आले आहे.