Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहिते – पाटलांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार, खासदार निंबाळकर यांची स्पष्टोक्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

मोहिते – पाटलांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार, खासदार निंबाळकर यांची स्पष्टोक्ती

Surajya Digital
Last updated: 2023/04/05 at 4:41 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 प्रा. अशोक निंबर्गी – सुरेश पाटील पाच वर्षांनी एकत्र; आता मतभेद, कटुता नसल्याचे दोघांचे स्पष्टीकरण

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने जर मोहिते-पाटील यांना तिकिट दिले, तर आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रचार करू, असे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. If Mohite-Patal is nominated, he will campaign, says MP Nimbalkar Solapur Akluj Madha Lok Sabha

 

माढ्याचे खासदार निंबाळकर हे मंगळवारी माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी माढ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना लोकसभा उमेदवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी निंबाळकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपमध्ये लोकशाही आहे. भाजपला वाटलं, उद्या माढ्यातून अन्य व्यक्तीला तिकिट द्यावे. नाव घेऊन सांगायचे झालं तर मोहिते -पाटील यांना तिकिट द्यावं, असे पक्षाला वाटले तरी काही गैर नाही. त्यांना जरी तिकिट दिलं तर आम्ही प्रामाणिकपणे मोहिते-पाटील यांच्या पाठीमागं उभे राहणार आहोत.

त्यामुळे पक्षात वाद होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. माझी शंभर टक्के कामे झाली आहेत, त्यामुळे पाच वर्षांच्या कामावर मी पूर्णपणे समाधानी आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता असून पक्ष जे सांगेल ते काम मी करणार आहे, असेही खासदार निंबाळकर यांनी नमूद केले.

 

○ सर्वांनी एकत्र फिरावे असे काही नाही

 

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, रणजितसिंह मोहिते-पाटील हे आमदार आहेत. सर्वांनी एकत्र फिरावे, असे काही नाही. पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्यांना सांगोल्याची जबाबदारी दिली होती, त्यांनी त्या ठिकाणी काम करावे. मी काल दिल्लीत होतो, आज कार्यक्रमानिमित्त माढ्यात यावे लागले.

 

○ निंबाळकर यांच्या विधानामागचे कारण काय ?

मध्यंतरी दिल्लीत माढ्याचे आ. बबनराव शिंदे आणि माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीमागे निंबाळकर असल्याची चर्चा होती. मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी निंबाळकर हे शिंदे यांच्याशी जवळीक साधत आहेत, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून होत असते. त्यामुळे निंबाळकर यांच्या आजच्या विधानामागचे कारण काय अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 प्रा. अशोक निंबर्गी – सुरेश पाटील पाच वर्षांनी एकत्र; आता मतभेद, कटुता नसल्याचे दोघांचे स्पष्टीकरण

 

सोलापूर : भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे तब्बल ५ वर्षांनी एकत्र एका व्यासपिठावर पाहावयास मिळाले निमित्त होते बसवंती स्मृती पुरस्कार पत्रकार परिषदेचे. या पत्रकार परिषदेत प्रा. निंबर्गी आणि सुरेश पाटील या दोघांनीही आता आमच्यामध्ये आता कोणतीही कटूता राहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

 

बसवंती पुरस्काराचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे या निमित्त मंगळवारी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला प्रा. अशोक निंबर्गी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, मयूर बसवंती आदी उपस्थित होते.

 

काही वर्षांपूर्वी सुरेश पाटील यांनी आपल्यावर विष प्रयोग झाला असून त्यामध्ये प्रा.निंबर्गी यांच्यासह पाचजणांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपमध्ये बराच गदारोळ झाला होता. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेपासून सुरेश पाटील आणि निंबर्गी यांच्यात दुरावा आला होता. मात्र बसवंती स्मृती पुरस्काराच्या पत्रकार परिषदेच्यानिमित्ताने हा दुरावा मिटल्याचे दिसून आले.

यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, आपल्यात आणि अशोक निंबर्गी यांच्यात आता कोणतीही कटुता राहिली नाही. झाले गेले गंगेला मिळाले. आपल्यावर विष प्रयोग झाला आणि तो करण्यामागे प्रा. निंबर्गी यांच्यासह आपण काही जणांची नावे घेतली.

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #ohite-Patail #nominated #campaign #says #MP #Nimbalkar #Solapur #Akluj #Madha #LokSabha, #मोहितेपाटील #उमेदवारी #त्यांचा #प्रचार #खासदार #निंबाळकर #स्पष्टोक्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्धव ठाकरे, फडतूस नही, काडतूस हुँ मैं, झुकेगा नहीं साला, घुसेगा; देवेंद्र फडणवीसांचा डायलॉग
Next Article राज्यात 13 व 14 एप्रिल रोजी कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल होणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?