Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पगार थकल्याने औरंगाबाद रुग्णालयात डॉक्टरांचे कामबंद आंदोलन; म्हणे राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ केली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पगार थकल्याने औरंगाबाद रुग्णालयात डॉक्टरांचे कामबंद आंदोलन; म्हणे राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ केली

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 1:23 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. तीन महिन्यांपासून पगार थकल्यामुळे निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. निवासी डॉक्टरांचे वैद्यकीय अधिक्षक कार्यालयासमोर निदर्शने सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाविरोधात डॉक्टरांची घोषणाबाजी सुरु आहे.

नुकतेच राज्यसरकारने निवासी डॉक्टराच्या विद्यावेतनात दहा हजारांने वाढ केल्याचे जाहीर केले. मात्र येथे तर तीन महिन्यापासूनच कोरोनात जीव धोक्यात घालून काम करुन पगार मिळत नाही. त्यासाठी डॉक्टरांना आंदोलन करावे लागणे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 490 निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांपासून पगार थकले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन महिन्यांचा पगार तातडीने द्या, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विदर्भातून रुग्ण येतात. या रुग्णांवर निवासी डॉक्टरांकडून उपचार केला जातो. आंदोलन करणाऱ्यांपैकी बरेचसे डॉक्टर कोरोना रुग्णांवरदेखील उपचार करत आहेत. तर काही डॉक्टर इतर आजारांवर उपचार करत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना संकटकाळात स्वत:चा जीव धोक्यात टाकून डॉक्टरांकडून रुग्णसेवा सुरु आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून घाटी रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना पगार मिळाला नाही. याआधी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांना रक्कम जमा झाली असून लवकरच पगार होईल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, अद्यापही डॉक्टरांचा पगार झालेला नाही.

“पगार होत नसल्याने सर्वांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आमच्यासाठी रुग्णसेवा प्राथमिक आहे. पण दोन दिवसात प्रशासनाला जाग आली नाही तर आम्हाला कोव्हिड सेवादेखील बंद करावी लागेल”, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #घाटी #औरंगाबाद #तीनमहिने #पगार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार ‘कोविड केअर रुग्णालय’; बुलढाण्यात रुग्णालय उभारले तर सांगलीत काम सुरू
Next Article नवदापंत्य लग्न मंडपातून थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात; कोरोना टेस्ट केल्यानंतरच केला गृहप्रवेश

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?