Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुधनी बाजार समिती निवडणूक : म्हेत्रे गटाचे दोन व्यापारी सदस्य बिनविरोध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दुधनी बाजार समिती निवडणूक : म्हेत्रे गटाचे दोन व्यापारी सदस्य बिनविरोध

Surajya Digital
Last updated: 2023/04/08 at 9:50 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

अक्कलकोट : दुधनी मार्केट कमिटीच्या आजवरच्या इतिहासात म्हेत्रे गटाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. शेतकऱ्यांचे हित,व्यापाऱ्यांचा विश्वास आणि पारदर्शी कारभार यामुळेच मार्केट कमिटीच्या निर्मितीपासून आजतागायत सत्ता कायम राखण्यात आम्ही यश मिळवले आहे.  Dhudhani market committee election: Two business members of Mhetre group unopposed Akkalkot ही वस्तुस्थिती विरोधकांना माहीत असूनही केवळ राजकारणापोटी षडयंत्र रचत मार्केट कमिटीची निवडणूक लावण्याचा चंग त्यांनी बांधल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत, असा घणाघात माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी केला.

 

छाननीनंतर माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचे ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार सिध्देश्वर गंगोडा यांचे शेत नसल्याचे कारण देत सतीश प्रचंडे यांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुरुवारी गंगोडा यांचा अर्ज नामंजूर केला. म्हेत्रे गटातील सातलिंगप्पा परमशेट्टी आणि चंद्रकांत येगदी या दोघांच्या विरोधात एकही अर्ज न भरल्याने व्यापारी मतदार संघातून हे दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रथमेश म्हेत्रे यांनी माहिती दिली.

 

पुढे बोलताना सभापती प्रथमेश म्हेत्रे म्हणाले की, स्वर्गीय लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या आशीर्वादाने माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या सहकार्याने मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आजवर हिताचे निर्णय घेतले आहेत. याचीच पोचपावती म्हणून व्यापाऱ्यांनी दोघांना बिनविरोध केले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

Visit us : www.surajyadigital.com

 

 

 

येत्या शनिवारी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवस असुन मार्केट कमिटीच्या व्यापाऱ्यांनी दोघांना बिनविरोध करून अनोखी भेट दिल्याचे सांगितले. व्यापार मतदारसंघातून विश्वनाथ म्हेत्रे,रेवणसिध्द पाटील, सिध्दाराम येगदी यांनी अर्ज माघारी घेतल्याने आपोआपच उर्वरित दोघे बिनविरोध निवडून आले आहेत.

दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघासाठी १०, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघासाठी ५, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ४,सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी-३१,सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण महिला गटासाठी ८, सहकारी संस्था मतदारसंघ इतर मागासवर्ग गट ४, सहकारी संस्था मतदारसंघ भटक्या जाती जमाती ६, व्यापारी मतदार संघातून ५ तर हमाल तोलार संघासाठी ४ असे एकूण ७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

एकूण दाखल ७९ अर्जापैकी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचे ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार सिध्देश्वर गंगोडा यांचे शेत नसल्याचे कारणाने दोन अर्ज नामंजूर झाले. उर्वरित ७७ अर्जापैकी माघार घेण्याचा गुरुवारी पहिल्या दिवशी व्यापार मतदार संघातून तीन व हमाल आणी तोलार मतदार संघातून दोन असे एकूण ५ अर्ज माघारी घेतले. गुरुवारी पर्यंत ७२ अर्ज शिल्लक होते. दुधनी बाजार समिती साठी ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असुन २१ एप्रिलला उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल व ३० एप्रिलला मतदान होणार आहे व ३० एप्रिललाच पाच वाजता मतमोजणी होणार आहे.

दुधनी साठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रकाश नालवार हे काम पाहत आहेत. दरम्यान दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर दुधनी व पंचक्रोशीत म्हेत्रे समर्थकांनी जल्लोष केला.

 

○ अक्कलकोट बाजार समिती सारखी हालत नको, नाराजीचा सूर…!

सद्यस्थितीत अक्कलकोट तालुक्यात दोन मार्केट कमिटी कार्यरत आहेत. अलीकडच्या काळात दुधनी मार्केट कमिटीकडे शेतकऱ्यांचा मोठा ओढा लागला आहे. याउलट अक्कलकोट मार्केट कमिटीतील नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. आगामी काळात याचे पडसाद काय असतील हे निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #dhudhni #market #committee #election #Two #business #members #Mhetre #group #unopposed #Akkalkot, #अक्कलकोट #दुधनी #बाजारसमिती #निवडणूक #म्हेत्रे #गट #दोन #व्यापारी #सदस्य #बिनविरोध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सौम्य लाठीमार
Next Article चंद्रकांत पाटलांकडून उध्दव ठाकरेंना युतीचे आमंत्रण

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?