○ सर्व बँकांमधील पक्षनिधीही हातून जातोय की काय ?
मुंबई : शिवसेना भवनावर शिंदे गटाचा अधिकार आहे, असा दावा करत या प्रकरणी एका वकिलाकडून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. Shiv Sena Bhavan, plea to court for party funds; Uddhav Thackeray’s problems increase in facing office politics विधानसभेतील शिवसेना कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर शिवसेना भवनावर ताबा आम्ही घेणार नसल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता एका वकिलाने शाखा, पक्ष निधी शिवसेनेला (शिंदे गट) देण्यात यावे, अशी या याचिकेत मागणी करण्यात आली आहे. Shiv Sena Bhavan, plea to court for party funds; Uddhav Thackeray’s problems increase in facing office politics
उद्धव ठाकरे यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर आता शिवसेना भवन, शाखा सर्व बँकांमधील पक्षनिधीही हातून जातोय की काय अशी परिस्थिती सध्या ठाकरे गटाची झाली आहे. नुकतीच सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. आता दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. शिवसेना गेल्यावर उध्दव ठाकरे यांचा शिवसेना भवनावर अधिकार राहील का, हा प्रश्न आहे. तसेच मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये असणाऱ्या शाखांचे काय होणार? यावर चर्चा रंगताना दिसून येत आहेत. अशात आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या निर्णयावर आधारित अॅड. आशिष गिरींकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये शिवसेनेच्या चल अचल संपत्तीवर दावा करण्यात आला आहे. तसंच शिवसेना भवन शाखा आणि सर्व बँकामधील पक्षनिधी शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे देण्याची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.
शिवसेनेकडे पक्षनिधी आहे. याशिवाय संपत्ती, संस्था, कार्यालय, शाखा आहेत. त्यावर कोणाचा हक्क याकडे न्यायालय अगदी वेगळ्या प्रकारे पाहतं. शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचे बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे तो पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून एक वकील आणि मतदार या नात्याने ही याचिका दाखल केली आहे, असं अॅड. आशिष गिरी यांनी सांगितलंय. दिल्लीतील प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. तसंच निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी देखील त्यांनी याचिकेतून केली आहे.
धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेल्याच्या धक्क्यातून उध्दव ठाकरे अद्याप बाहेर पडले नाहीत तोवर त्यांना आणखी एका मोठा धक्का मिळालाय. त्यामुळे आता या याचिकेवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.