सोलापूर : शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी (ता.11) दुपारी महानगरपालिका कौन्सिल हॉल समोर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माठ फोडून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पाणी द्या ,पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. Give water or lower the chairs; On behalf of BJP, Math Fodo movement in the Municipal Corporation
सोलापूर शहरात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले असून सोलापूरात पाणी पुरवठा वेळेवर करावा या मागणीसाठी महापालिका आयुक्त कार्यालयासमोर माठ फोडून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. विविध घोषणाबाजीही करण्यात आली. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांची भेट घेऊन शहरात पाणीपुरवठा करण्यास काही अडचण येत असून लवकरात लवकर शहराला पाणीपुरवठा सुरळीत करू असे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील ,माजी नगरसेवक नागेश भोगडे , अमर पुदाले ,अजित गायकवाड, भाजपा उपाध्यक्ष राजकुमार पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष गणेश साखरे, , प्रेम भोगडे ,अजित गादेकर, ज्ञानेश्वर कारभारी, संतोष बंडगर, माजी नगरसेविका कल्पना कारभारी ,शालन शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
○ …. तर तीव्र आंदोलन करणार : डॉ. देशमुख
मागील महिनाभरापासून महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वेळेवर पाणी सोडत नाही. त्याचबरोबर दूषित पाणी सोडण्यात येत आहे. वारंवार तक्रार, निवेदन देउन सुद्धा सोलापूर शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. लवकरात लवकर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ पाणी न दिल्यास आगामी काळात आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोठा मोर्चा करण्यात येईल असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी दिला.
○ पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल : कारंजे
सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासन काम करीत आहे. लवकरच सोलापूर शहराला सुरळीत व स्वच्छ पाणी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी यावेळी दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ग्रामीण पोलीस दलात दोन महिला अधिकारी रुजू
सोलापूर : पोलीस दलाच्या प्रशिक्षणानंतर परिविक्षाधिन अधिकारी म्हणून नयोमी साटम यांची सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून तर रोहिणी बानकर यांची प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक म्हणून नियुक्ती झाल्याचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
भारतीय पोलीस सेवेचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस दलाच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव यावा म्हणून जिल्हा पातळीवरील पोलीस दलात अधिकाऱ्यांना पाठवण्यात येते. ६ महिने त्यांना विविध पातळीवर प्रशिक्षणाचा अनुभव देण्यात येतो.प्रत्यक्ष काम करण्याची संधी त्यांना मिळते.
त्याच पार्श्वभूमीवर मूळच्या कोकणातील परंतु मुंबईत राहात असलेल्या नयोमी साटम यांनी नुकतेच भारतीय पोलीस सेवेचे प्रशिक्षण हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अॅकॅडमी येथे पूर्ण केले असून,त्यांना सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
महाराष्ट्र पोलीस सेवेचे प्रशिक्षण पूर्ण करून रोहिणी बानकर यांना सहाय्यक पोलीस उपअधिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. या दोन्ही महिला अधिकारी उच्च शिक्षित असून,त्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलात प्रत्यक्ष काम करण्याची संधी आणि अनुभव मिळणार आहे.