सोलापूर : मार्केट यार्ड परिसरात थांबलेला ट्रकचालक, शेतकरी ग्राहकांचे मोबाइल चोरून, हिसकावून नेत कमी किमतीत विकल्याप्रकरणी दोन हमालांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 32 मोबाइल पोलिसानी जप्त केले आहेत. Police succeeded in seizing as many as 32 mobile phones from criminals, Solapur
अक्षय सीताराम कांबळे (वय-२२,रा.भारतरत्न, इंदिरानगर), इम्रान शब्बीर इनामदार (वय-२४,रा. भारतरत्न, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. गुरुवारी एका ट्रकचालकाच्या हातून दोन दुचाकीस्वारांनी दमदाटी करत मोबाइल हिस्कावून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यांचा तपास करताना जोडभावी पोलिसांनी आरोपींची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले. दरम्यान त्यांच्याकडून ३ लाख ७७ हजार रुपयांचे ३२ मोबाइल जप्त करण्यात आले आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून,त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले.
ही कामगिरी पोलिस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त संतोष गायकवाड, जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि पवार, पोसई चक्रधर ताकभाते, हेडकॉस्टेबल श्रीकांत पवार,खाजप्पा आरेनवरू, भारत गायकवाड, शीतल शिवशरण,सचिन बाबर, सुरेश जमादार, अय्याज बागलकोटे,स्वप्नील कसगावडे, सोमनाथ थिटे, उमेश कात्रजकर यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ खल्लास करतो म्हणत डॉक्टरने महिलेच्या डोक्यात घातली खुर्ची
• डॉक्टर पती-पत्नीवर गुन्हा
सोलापूर : तू कामावर नाही आली तर तुला खल्लास करतो असे म्हणत शिवीगाळ करत डॉक्टरने महिलेच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची घालून जखमी केल्याची घटना दि.८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान डॉक्टरांच्या घरी घडली.
याप्रकरणी गीता अरविंद भाकरे यांनी (रा.देशमुख पाटील वस्ती,आमराई) त्यांच्या डॉक्टर विजयकुमार इंगळे व त्यांची डॉ.पत्नी दीपा विजयकुमार इंगळे (दोघे.रा.अभिमानश्री नगर,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी व उमा असे दोघेजण मिळून डॉक्टर इंगळे यांच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी डॉ.इंगळे यांना तुम्ही माझे जावई यांना फोन करून माझ्या कामाबद्दल बोललात असे विचारले असता,इंगळे यांनी फिर्यादी यांना उमा ही कामावर न आल्याने मी तुमच्या जावई यांना फोन केला होता, तुम्ही आता कामावर येणार आहात की नाही ते सांगा असे दोघींना म्हणाले.त्यावेळी उमा यांनी डॉक्टर इंगळे व त्यांची पत्नी डॉ.दिपा यांना ती कामावर येणार नसल्याचे सांगितले.
त्यावेळी डॉक्टर इंगळे व त्यांची पत्नी यांनी उमा यांना घराबाहेर पाठवून घराचा दरवाजा आतून लावून फिर्यादी यांच्याशी हुज्जत घालू लागले व मागील महिन्याचा उमा यांना दिलेला पगार आताच्या आता आम्हाला परत द्या असे म्हणाले. त्यावेळी डॉक्टर इंगळे यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून प्लास्टिकची खुर्ची उचलून डोक्यात घालत खल्लास करतो, असे म्हणून धमकी दिली आहे.तसेच डॉक्टर दीपा यांनी झालेल्या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्याला ओरबडले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.