मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. Uddhav Thackeray on Silver Oak on Sharad Pawar’s statement; Sanjay Raut Supriya Sule had a one hour discussion among the four leaders या चार नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानाहून रवाना झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मविआमध्ये सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे या सिल्व्हर ओक या निवासस्थानी होत असललेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीचे नेते आहे. विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी ही भेट होत आहे. ज्या पद्धतीने भाजपचे नेते चंद्रकांत पाटील असो की प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असो बकवासगिरी करत आहे. तसं महाविकास आघाडीत काहीच नाही. महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नाही. चर्चा करणारे हे मिंधे गट आणि भाजप आहेत. आज आम्ही एकोप्याने महाराष्ट्रात आहोत”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली होती.
शरद पवार यांनी एका माध्यमाला
दिलेल्या मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे. “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही”, असे सांगितले आहे. शरद पवारांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. राजकारणातील विविध मुद्द्यांवर त्यांनी राज्यकर्त्यांचे कान टोचले. शरद पवार हे राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याकडून आलेले मत देखील राजकारण्यांसाठी तेवढेच महत्वाचे असतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आले होते. त्यानुसार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली. उध्दव ठाकरे हे मातोश्रीहून सिल्वर ओककडे रवाना झाले. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना मित्रपक्षांना विचारात घेतले नाही, असे आज पवार म्हणाले होते.
या भेटीत आघाडीतील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती कळतंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी अंतर्गत कलह सुरू आहे. शिवाय सावरकर मुद्द्यावरून देखील ठाकरे गट आक्रमक झाल्यानतंर काँग्रेसची अडचण झाली आहे. या सगळ्यात पवारांनी मध्यस्थी करून विषय मिटवला असला तरी आता मतभेत दूर झालेत का हा प्रश्नच आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडण्याची शक्यता आहे असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते.