सांगली : कोरोनाच्या काळात मदत करणारे खूप समोर आले. सेल्फीसह प्रसिद्धीसाठी व्याकूळ झालेले बोगस दानशूरही पाहिले. मात्र यास टाटा ट्रस्ट अपवाद ठरला आहे. केंद्र, राज्याला सढळ हाताने दीड हजार कोटी मदत करुन जिल्ह्याच्या मागणीनुसार कोविड सेंटरसाठीही निधी देत आहेत. काही लाख मदत केली की नाव देण्याची अपेक्षा केली जाते. यातपण टाटा समूहाचा निस्वार्थपणा दिसून आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने 10 कोटी रुपये खर्च करुन इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय अतिशय अद्यावत केले आहे. बुलढाणा, सांगली नंतर आता बारामतीतही टाटा समूहाच्या सहकार्याने कोविड सेंटर उभारले जात आहे. कोट्यवधी पैसा खर्चून ही कोणत्यात इमारतीवर टाटा समूहाने नावाची अपेक्षा ठेवलेली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय अतिशय अद्यावत केले आहे. यंत्र सामग्रीसह, फ्लोरिंग, टेलिमेडिसिन, सीसीटीव्ही, व्हेंटीलेटरसह नूतनीकरणी करण्यात आले आहे. या रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम टाटा ट्रस्टच्या मदतीने करण्यात आले आहे. त्यामुळे अतिशय गंभीर रुग्णांवरही उपचार करण्याची सोय येथे झाली आहे. इस्लामपूर वासीयांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरण व अद्ययावतीकरणामुळे इस्लामपूरच्या वैभवात भर पडली आहे.
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने इस्लामपूर येथील जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण केले. या इमारतीचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते तर राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये विविध ठिकाणी रुग्णालये व्हावीत यासाठी टाटा समूहाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार रतन टाटा यांनी त्यास मान्यता देऊन इस्लामपूर येथे जिल्हा उपरुग्णालयाच्या इमारतीचे नूतनीकरण केले. टाटा हे मूल्यांसाठी ओळखले जातात. संपूर्ण देशाला त्यांच्याबद्दल आदर आहे. टाटा ट्रस्टने अत्यंत गरजेच्यावेळी समाजाला व शासनाला मदत दिली आहे. इस्लामपूर व बुलढाणा या ठिकाणी दिलेल्या आरोग्य सुविधेबद्दल टाटा व टाटा ट्रस्ट यांचे महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत.
याप्रमाणे जालना येथे अशा प्रकारची आरोग्य सुविधा द्यावी, असे आवाहन टाटा ट्रस्टला शासनाने केले आहे. टाटा ग्रुपने हे उपरुग्णालय अद्यावत करण्यासाठी तयारी दर्शवली आणि हे रुग्णालय आज उभे राहिले आहेत. या संकटकाळात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. टाटा समूहाने इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचारासाठी अत्यंत जलद कलावधीमध्ये अंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा निर्माण केली आहे. 50 बेडची डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयाची सुविधा उभी राहिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा सुविधांची गरज व महत्व फार मोठे आहे.