Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । गस्तीसाठी आले गुरखे ; चौघांना मिळाली भीमेत जलसमाधी, नेपाळी कुटुंब झाले पोरके
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर । गस्तीसाठी आले गुरखे ; चौघांना मिळाली भीमेत जलसमाधी, नेपाळी कुटुंब झाले पोरके

Surajya Digital
Last updated: 2023/04/14 at 11:52 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

¤ एकमेकांना वाचवण्याच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

 

Contents
¤ एकमेकांना वाचवण्याच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ नमुना व हिरदेशचे मृतदेह सापडले सायंकाळी○ चौथ्या दिवशी चौघांचा मृत्यू

मंगळवेढा : सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. भीमा नदीत एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला व दोन मुलांचा समावेश आहे.  Solapur. Gurkhas came to patrol; Four people got water burial in Bhima, Nepali family became Porke Mangalvedha Siddhapur बालूदमाई नेपाळी, मनसरादमाई नेपाळी, हिरदेश नेपाळी, नमुना नेपाळी अशी मृतांची नावे आहेत. नदीकाठावर महिला कपडे धूत होत्या. त्यावेळी मुले नदीत वाहून जात असल्याचे त्यांना दिसले. मुलांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली असता त्याही वाहून गेल्या.

 

रात्रगस्त घालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या आठच दिवसांपूर्वी सिध्दापूर (ता. मंगळवेढा) गावात आलेल्या नेपाळी कुटुंबातील दोन महिला आणि दोन लहान मुलांचा गुरूवारी दुपारी भीमा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सासू-सुनेसह दोन नातवंडाचा समावेश असल्यामुळे पोटासाठी आलेले गुरखे कुटुंब पोरके झाले आहे.

 

ही घटना गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास सिध्दापुरातील भीमा नदीपात्रात घडली. सायंकाळपर्यंत चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर सिध्दापूर गावावर शोककळा पसरली असून नेपाळी कुटुंबाचा आक्रोश पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

 

बालुदमाई कर्णसिंग सिंग (वय ३०), मनसरादमाई बसंतदमाई सिंग (वय ३०), नमुना कर्णसिंग सिंग (वय ११), हिरदेस बसंतदमाई सिंग (वय ८, सर्व रा. जुम्बुकॉच, ता. चामुंडा ब्रिदासैनी, जि. दैलेक, राज्य काठमांडू, प्रदेश कर्नाली, देश नेपाळ) अशी मृतांची नावे आहेत. गुरूवारी (ता. 13) दुपारी बाराच्या सुमारास बालुदमाई कर्णसिंग सिंग, मनसरादमाई बसंतदमाई सिंग ह्या दोघी सासू-सून धुणे धुण्यासाठी म्हणून सिध्दापुरातील भीमा नदीच्या पात्रात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत नमुना, हिरदेश व संदेश हेसुध्दा गेले होते. बालुदमाई आणि मनसरादमाई (सासू-सून) ह्या दोघी नदीपात्रातील पाण्यात धुणे धूत असताना नमुना, हिरदेश आणि संदेश हे तिघेही तिथेच पाण्यात पोहत होते. पोहता पोहता नमुना व हिरदेश हे पाण्यात बुडू लागले. ते पाहून त्यांना वाचवण्यासाठी बालुदमाई आणि मनसरादमाई ह्या दोघीसुध्दा पाण्यात गेल्या. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही पाण्यात बुडाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

○ संदेशने ठोकली घराकडे धूम

 

आपल्या घरातील चौघेही पाण्यात बुडाल्याचे पाहून त्यांच्यासोबतच असणारा संदेश हा लहान मुलगा घाबरून घराकडे पळाला. घरी कर्णसिंग धनसिंग सिंग (वय ५६) आणि त्याचा पुतण्या बसंतदमाई सिंग हे घरी होते. संदेशने नदीपात्रातील प्रसंग सांगितल्यानंतर कर्णसिंग व बसंतदमाई यांनी नदीकडे धाव घेतली. ते ओरडत नदीकडे पळत असल्याचे पाहून गावकरीसुध्दा त्यांच्या मागोमाग नदीपात्राकडे पळाले. सर्वजण पाण्यात उतरले तेव्हा बालुदमाई आणि मनसरादमाई यांचे मृतदेह सापडले.

 

○ नमुना व हिरदेशचे मृतदेह सापडले सायंकाळी

 

दरम्यान, नदीकाठी गर्दी झाली. तोपर्यंत ही माहिती पोलिसांनाही पोहचली. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा नदीकाठी आला. गावकऱ्यांच्या मदतीने दिवसभर मृतदेहाचा शोध सुरू होता. सायंकाळच्या सुमारास नमुना आणि हिरदेश यांचे मृतदेह सापडले. चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक पिंगळे पुढील तपास करीत आहेत.

 

○ चौथ्या दिवशी चौघांचा मृत्यू

 

कर्णसिंग धनसिंग सिंग (वय ५६) आणि त्याचा पुतण्या बसंतदमाई सिंग हे आठ दिवसांपूर्वी सिध्दापुरात आले होते. रात्रगस्त घालण्याचे काम ते करत होते. सिध्दापुरात राहण्यास घर मिळाल्यानंतर कर्णसिंगची पत्नी बालुदमाई, पुतण्याची पत्नी मनसरादमाई, मुलगी नमुना, नातू हिरदेश आणि संदेश हे तीन दिवसांपूर्वी सिध्दापुरात आले होते. त्यानंतर चौथ्याच दिवशी या कुटुंबातील चौघांना जलसमाधी मिळाली.

 

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Solapur #Gurkhas #came #patrol #Four #people #water #burial #Bhima #Nepalifamily #became #Porke #Mangalvedha #Siddhapur, #सोलापूर #गस्त #मंगळवेढा #सिध्दापूर #गुरखे #चौघा #भीमा #जलसमाधी #नेपाळी #कुटुंब #पोरके
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लगाम लावाच…आता नाही सहन होत…
Next Article भाजप  डॉ. आंबेडकर जयंती साजरी करणार; मागासवर्गीय मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न

Latest News

पंतप्रधान मोदींनी देशासाठी समर्पित केलेली ११ वर्ष कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी;  दरेकरांचे आवाहन
महाराष्ट्र June 24, 2025
मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र June 24, 2025
माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
महाराष्ट्र June 24, 2025
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 24, 2025
crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?