नवी दिल्ली : देशात 500 हून चोऱ्यांचा आरोप असलेल्या देवेंद्र उर्फ बंटीला अटक करण्यात आली आहे. चोरलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत दिल्लीच्या साऊथ डिस्ट्रिक पोलीसांनी त्याचा तब्बल 500 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्याला कानपूर येथे अटक केली. India’s ‘super’ thief is finally jailed, Devendra aka Bunty has released a film on him called ‘Oy Lucky Oy’
सुपर चोर बंटी या नावाने प्रसिद्ध असलेले देवेंद्र सिंग हे दिल्लीतील विकासपुरी येथील रहिवासी असून अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असल्याने तो सुपर चोर म्हणून ओळखला जाऊ लागला. लोकांसमोरच्या घरातून वस्तू चोरून फरार होण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. बंटी चोरवर एक चित्रपटही तयार झाला आहे. याआधी त्याने एका गुन्ह्यात 2010 मध्ये 3 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगली.
सुपर चोर बंटी उर्फ देवेंद्र याला दिल्लीच्या दक्षिण जिल्ह्यातील चित्तरंजन पार्क पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. सुमारे 500 किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला कानपूर येथून अटक केली.या प्रकरणांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुपर चोर बंटीवर ‘लकी ओय लकी’सह अनेक चित्रपट बनले आहेत. बंटी सुपर चोर एका खास पॅटर्नमधून चोरी करतो. त्यावर ‘ओय लकी ओये’ चित्रपटही बनवण्यात आला आहे. या चित्रपटात बंटीची भूमिका अभिनेता अभय देओलने साकारली आहे. खोसला का घोसला सारखे हिट चित्रपट देणाऱ्या दिबाकर बॅनर्जी यांनी हा चित्रपट बनवला आहे. तो बिग बॉसमध्येही राहिला आहे. आरोपींच्या चोरीच्या पद्धती अतिशय अनोख्या आणि प्रसिद्ध आहेत.
दिल्लीतील सुपर चोर बंटी उर्फ देवेंद्र सिंग याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर कैलासमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याचा कानपूरपर्यंत पाठलाग करून त्याला अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलासमधील 2 घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये बंटी चोरचे नाव समोर आले. बंटीकडून चोरीचा बराचसा मालही जप्त करण्यात आला असून त्यात 2 लॅपटॉप, 3 मोबाईल फोन आणि 5 एलसीडी आणि घरातील अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
बंटी चोरने बिग बॉस या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये त्याला स्पर्धक म्हणून समावेश करण्यात आले होते. त्याच्या या कृत्यांमुळे तो शोमध्ये येताच खूप प्रसिद्ध झाला. त्याने शोमध्ये प्रवेश करताच इतर स्पर्धकांशी खूप गोंधळ घातला आणि गैरवर्तन केले. त्याच्या या कृत्यांमुळे त्याला शोच्या दुसऱ्याच दिवशी बिग बॉसच्या घरातून हाकलून देण्यात आले.