Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्याच्या सहकार क्षेत्रात केंद्रीय सहकार मंत्र्यांचे दमदार पाऊल; ‘पॅक्स’ची संख्या दुप्पट करणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राज्याच्या सहकार क्षेत्रात केंद्रीय सहकार मंत्र्यांचे दमदार पाऊल; ‘पॅक्स’ची संख्या दुप्पट करणार

Surajya Digital
Last updated: 2023/04/15 at 4:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अमित शाह आज मुंबईत

● केंद्राकडून राज्यात ‘सहकार विकास समित्यां’ची स्थापना

सोलापूर – केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्राथमिक कृषी सहकारी संस्था सक्षम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने राज्य आणि जिल्हास्तरावर सहकार विकास समित्यांची स्थापना केली आहे. Union Co-operative Minister’s strong footing in state co-operative sector; Amit Shah will double the number of ‘PAX’

या समित्यांवर प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे या समित्यांच्या माध्यमातून भाजप आता सहकार क्षेत्रात मजबूत पकड निर्माण करीत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. केंद्र सरकारने सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना (पॅक्स) सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार ज्या गावात सहकारी संस्था अस्तित्वात नाहीत, तेथे नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था किंवा दुग्ध, मत्स्यव्यवसाय संस्था स्थापन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये राज्य आणि जिल्हास्तरावर जिल्हा सहकार विकास समित्या स्थापन केल्या आहेत.

 

केंद्राच्या निर्णयानुसार देशात पुढील पाच वर्षांत दोन लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय सहकारी डेटाबेस तयार करणे, त्रिस्तरीय रचनेनुसार प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचा जिल्हा आणि राज्य बँक यांच्याशी समन्वय राखून संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच केंद्राच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

Visit us : www.surajyadigital.com

 

केंद्राच्या या निर्णयामुळे भाजप राज्यातील सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

 

केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहकार विकास समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्यपदी राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच इतर सदस्यांमध्ये सहकार व पणन, कृषी, पशुसंवर्धन, महसूल, ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त किंवा प्रधान सचिव, तसेच सहकार आयुक्त, नाबार्ड, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, मत्स्य विकास महामंडळाचे प्रतिनिधी असणार आहेत.

 

● अमित शाह आज मुंबईत

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (शनिवारी) सायंकाळी मुंबईत येत आहेत. आगामी निवडणुकांच्या रणनीतीसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा ते आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकही होईल. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असणार आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे. तुफान आ रहा है… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जिथे जातात, त्या ठिकाणी असंख्य राजकीय हालचाली सुरु होतात. शाह यांचे शनिवारी मुंबईत आगमन होतंय, त्यामुळेच ‘हे सर्व प्राणी घाबरलेत, असे ते म्हणाले. दरम्यान, शाह यांचा दोन दिवसीय दौरा आहे.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

TAGGED: #Union #Co-operative #Minister #strong #footing #state #co-operative #sector #AmitShah #double #number #PAX', #राज्य #महाराष्ट्र #सहकार #क्षेत्र #केंद्रीय #सहकारमंत्री #दमदार #पाऊल #पॅक्स #संख्या #दुप्पट #करणार #अमितशहा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट । पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून, पोलीस कोठडीत रवानगी
Next Article bus accident महाराष्ट्रात पहाटे झालेल्या बस अपघातात 13 जणांचा मृत्यू

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?