नवी दिल्ली : माफिया व माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफची पोलिस ताब्यात असताना तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वकिल विशाल तिवारी यांनी याचिका दाखल केली आहे. उत्तर प्रदेशात 2017 पासून झालेल्या 183 एन्काउंटरची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तिवारी यांनी याचिकेतून केली आहे. त्यामुळे अतिक अहमद हत्याप्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. Atiq Ahmed murder case in Supreme Court; Accused said he killed for fame Kothadi Prayagraj..
तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी माफिया अतिक अहमद आणि अशरफ या दोघांच्या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या 3 आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांना कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लवलेश तिवारी, सनी सिंग आणि अरुण मौर्य अशी आरोपींची नावे आहेत. शनिवारी अतिक आणि अशरफ या दोघांना मेडिकल टेस्टला आणले असता त्यांच्यावर आरोपींनी गोळीबार केला.
प्रसिध्दी मिळवण्याच्या इच्छेने कुख्यात गुंड अतिक अहमदची हत्या केल्याचे तिन्ही आरोपींनी प्राथमिक चौकशीत सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लवलेश तिवारी व मोहीत सिंग यांची पहिल्यांदा भेट चित्रकूट येथील तुरुंगात झाली होती. तिसरा आरोपी अरुण कुमार मौर्य हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधीत आहे. या तिघांना कोणी सुपारी दिली होती कि तिघांनी ठरवून अतिकची हत्या केली याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येतील तीन आरोपींना आगाऊ प्रत्येकी दहा लाख रुपयेही मिळाले होते. तीन आरोपींपैकी एक मोहित उर्फ सनी कारागृहातच हँडलरच्या संपर्कात आला होता, जिथे त्याला खून करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. या हँडलरने तिघांनाही पिस्तूल आणि काडतुसे दिली होती, अशीही माहिती पुढे आली आहे. लवलेश तिवारी (बांदा), मोहित उर्फ सनी (हमीरपूर) आणि अरुण मौर्य (कासगंज) यांच्यावर अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शस्त्र बाळगल्याप्रकरणीही या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हल्ला झाल्यानंतर या तिन्ही हल्लेखोरांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळं पोलिसांना या घटनेतील मुख्य गुन्हेगार हाती आलेले आहेत. आता ही हत्या कुणाच्या सांगण्यावरुन करण्यात आली, याचा पोलीस तपास करीत आहेत.
अतिक आणि अशरफचे रविवारी (ता.16) दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी अतिकच्या शरीरातून एकूण 8 गोळ्या काढल्या. त्यापैकी 1 डोक्यात, 1 मानेत, 1 छातीत आणि 1 कमरेत घुसली आहे. दुसरीकडे, अशफला 5 गोळ्या लागल्या आहेत. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने अतिक-अशरफ यांच्या तिन्ही हल्लेखोरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. घटनेच्या वेळी पोलिसांनी तिघांनाही घटनास्थळावरून पकडले होते. तिघांचीही कोठडीत चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून हे हत्याकांड घडवण्याचे कारणही सांगितले. पोलिसांनी या तिघांची कुंडली तपासली असता, ते हिस्ट्रीशीटर असल्याचे समोर आले. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
तिन्ही हल्लेखोर एकमेकांना आधीच ओळखत होते. सनी आणि लवलेशची बांदा जेलमध्ये भेट झाली, नंतर त्यांची मैत्री झाली, तर सनी आणि अरुण आधीच मित्र होते आणि सनीनेच लवलेशची अरुणशी ओळख करून दिली. अतिकला प्रथम गोळ्या घालणारा लवलेश तिवारी बांदा येथील रहिवासी असून त्याच्यावर गुंडगिरी आणि भांडणाचे 406 गुन्हे दाखल आहेत. लवलेशचे वडील व्यवसायाने ड्रायव्हर असून त्यांचे कुटुंब भाड्याच्या घरात राहते. अरुणवर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 2014-15 च्या GRP कॉन्स्टेबल हत्याकांडातही तो आरोपी आहे. या प्रकरणी अरुण मौर्य उर्फ कालिया तुरुंगात कैद होता. शूटर नंबर 3: मोहित उर्फ सनी – सनी हा हमीरपूरचा रहिवासी असून तो एका मोठ्या टोळीशी संबंधित असल्याचा संशय आहे. सनी सहा महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. 12 वर्षांपूर्वी त्याने घर सोडले. सनीने सुंदर भाटी गँगसाठीही काम केल्याचे सांगितले जात आहे.
मारेकरी लवलेश तिवारी याचे वडिल यग्य तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले की, आपला मुलगा बेरोजगार होता व मादकद्रव्यांचा व्यसनी होता. मी टीव्हीवर ही घटना पाहिली. आमचा त्याच्याशी बरेच दिवस संबंध नव्हता. त्याने हे कृत्य का केले याची आम्हाला कल्पना नाही. तो आमच्या कुटुंबाबरोबर राहात नव्हता. तो पाच सहा दिवसांपुर्वी आमच्या घरी आला होता. त्याच्या विरोधात काहीं गुन्हे दाखल आहेत. तेव्हापासून आम्ही त्याच्याशी संबंध तोडले होते. तो पुर्ण बेरोजगार होता आणि मादक द्रव्यांचेही तो व्यसन करायचा असे त्यांनी सांगितले.
दुसरा मारेकरी सनी सिंह याचा भाऊ पिंटू सिंह याने सांगितले की, सनी सुद्धा बेरोजगार होता, तो काहीही काम धंदा न करता इकडेतिकडे हिंडत असायचा. तो आमच्या बरोबर राहात नव्हता. तो गुन्हेगार कसा बनला याची आम्हाला कल्पना नाही. कालच्या घटनेबद्दलही आम्हाला काहीही कल्पना नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 घोषणा देत कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली. घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.
गोळी कोणी चालवली हे अद्याप समजू शकलेले नाही. तिघांनी त्यांच्यावर मेडिकल तपासणीसाठी घेऊन जाताना अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे तर अतिक आणि अशरफचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
प्रयागराजमधील मेडिकल कॉलेजबाहेर तीन जणांनी जय श्री राम, अशा घोषणा देत अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफवर गोळ्या झाडल्या. यानंतर या तिघांनीही तत्काळ आत्मसमर्पणही केले आहे. यापूर्वी 13 एप्रिलला झांसी जिल्ह्यातील परीछा डॅम भागात अतीकचा मुलगा असद आणि मुहम्मद गुलाम यांचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाला होता. आजच अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलीस बंदोबस्तात कसारी-मसारी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या झाली. अतिकचा मुलगा असद याच्या दफनविधीसाठी अतिकला जाता आले नाही त्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर ‘नहीं ले गए तो नहीं ले गए’, असे अतिक म्हणाला. त्यानंतर अतिकने ‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लीम…’ असे म्हणताच अतिकवर तीन हल्लेखोरांनी बंदुकीने गोळीबार केला. त्यात त्याचा व अशरफचा जागीच मृत्यू झाला.
उमेश पाल हत्याकांडात पोलीस अतीक अहमदचा मुलगा असद, अरमान, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांच्या शोधात होते. यांच्यावर 5-5 लाख रुपयांचे बक्षिसही घोषित करण्यात आले होते. पोलिसांनी असद आणि गुलाम यांचे एनकाउंटर केले. तीन शूटर अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबिर यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी पोलिसांनी दोन शूटर अरबाज आणि विजय चौधरी उर्फ उस्मान यांचे एनकाउंटर केले होते.
अतिक अहमद हा प्रयागराज जिल्ह्यातील गुन्हेगार होता. तो सलग पाच वेळा अलाहाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग 5 वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आला होता. समाजवादी पक्षाकडून भारतीय संसद आणि उत्तर प्रदेश विधानसभेचा माजी सदस्य होता. त्यांची आज गोळ्या मारून हत्या करण्यात आली आहे. अतिकवर 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते. त्याला काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने ताब्यात घेतले होते.
अतिक अहमद आणि अशरफ यांची काल रात्री तिघांनी हत्या केली आहे. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आहे आहे. दरम्यान, अतिकची हत्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच योगी सरकारने 17 पोलिसांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माफिया अतिक अहमदच्या हत्येवर प्रतिक्रीया दिली आहे. ‘अतिक आणि त्याचा भाऊ पोलिस कस्टडीत होते. त्यांना हाथकड्या लावलेल्या होत्या. जय श्री रामचे नारेही लावण्यात आले. दोघांची हत्या होणे हे योगींच्या कायदा व्यवस्थेचे अपयश आहे. एन्काउंटर राजचा आनंद साजरा करणारेही या हत्येसाठी जबाबदार आहेत’, असे ओवैसी म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अतीक अहमद आणि अशरफच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
प्रयागराजच्या घटनेनंतर लखनऊ पोलीस हायअलर्टवर आहेत. पोलिसांनी जुन्या लखनऊच्या हुसैनाबादमध्ये लोकांशी संवाद साधून गर्दी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रयागराजमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी गस्त आहे. तसेच परिसरात अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांवर प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे. आसपासच्या जिल्ह्यांतून पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. हे हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी बनून आले होते अशी माहिती देण्यात येत आहे.
अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. याशिवाय, अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.