Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsब्लॉगराजकारण

‘सततची तोंडपाटीलकी’ नडली… अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करतीय

Surajya Digital
Last updated: 2023/04/19 at 5:53 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

राज्याच्या राजकीय पटलावरील मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व. कोल्हापुरातून मुंबईत गेलेल्या एका गिरणी कामगाराच्या मुलाने कोणतेही राजकीय बाळकडू किंवा कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही राज्याच्या राजकारणात मारलेली मजल निश्चितच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक रोडमॅप ठरावा, अशीच आहे. ‘Constant gossip’ is gone… Invisible superpower is also working with equal strength Politics Chandrakant Patil

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)– परशराम पाटील

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या चंद्रकांत पाटील यांचे आज ज्यांच्या हातात भाजप पूर्णत: सामावला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी त्यांचे अनेक दशकांचे संबंध आहेत. अमित शाह यांची सासुरवाडी कोल्हापूर असल्याने आणि चंद्रकांत पाटील सुद्धा मूळचे कोल्हापूरचे असल्याने दोघांमधील स्नेहाचे संबंधही सर्वश्रुत आहेत.

 

भाजपची मातृशाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शब्द प्रमाण मानून काम करणारे तसेच आयुष्यातील उमेदीच्या काळापासून ते आज पक्षाला सोन्याचे दिवस आणून देणाऱ्यांमध्ये राज्यातील हाताच्या बोटावरील मोजक्या नेत्यांमध्ये ज्यांचा समावेश होतो, तेच चंद्रकांत पाटील. आयुष्याच्या साठीमध्ये उत्तुंग राजकीय यशाने कारकीर्द गाजवण्याऐवजी सलग वादग्रस्त वक्तव्ये करून स्वतःचे कारण नसताना हसे करून घेत आहेत का? अशी शंका येऊ लागली आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी १९८० च्या दशकात अभाविपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी प्रचारक म्हणूनही काम केले. ते १३ वर्ष संघाचे प्रचारक होते. त्यांना संघाकडून पश्चिम महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्येही ते सक्रिय होते. २००५ मध्ये त्यांना मातृशाखेतील कामाचे बक्षीस मिळून भाजपत संधी मिळाली. त्यांनी दोन वेळा पुणे पदवीधरमधून नेतृत्व केले. त्यानंतर त्यांना २०१४ मध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ मध्येही त्यांना संधी मिळाली होती. त्यांनी एक वेळा मुख्यमंत्रिपदाची इच्छा सुध्दा व्यक्त केली होती. मात्र, याच वक्तव्यामुळे भाजपमध्ये त्यांना विरोधक निर्माण झाले का? अशीही चर्चा आहे.

 

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही त्यांना शिवसेनेकडील खाते देण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडून तातडीने काढून घेण्यात आले. यावरून भाजपमध्येही त्यांच्याविरोधात अदृश्य महाशक्ती सुद्धा तितक्याच ताकदीने काम करत असल्याचे दिसून येते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या दीड वर्षांपासून चंद्रकांतदादांचे वादग्रस्त वक्तव्य आणि वाद समीकरण होत गेले आहे. ज्या सोशल मीडियाचा वापर करून भाजपने विरोधकांना नेस्तनाबूत करून टाकले, तोच सोशल मीडिया चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरही उलटला आहे.

 

 

कोणताही सारासार विचार न करता, त्याचे पडसाद काय उमटतील? याचा विचार न करता त्यांच्या तोंडातून राज्याची अस्मिता असणारे महापुरुष सुटले नाहीत. आता त्यांनी बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हता असे म्हणत बाळासाहेब ठाकरेंनाच लक्ष्य केल्याने अत्यंत स्नेहाचे संबंध असलेल्या थेट अमित शाह यांचीही नाराजी ओढावून घेतल्याची चर्चा आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी सुध्दा त्यांच्यापासून अंतर राखले.

 

चंद्रकांतदादा यांच्याकडून सातत्याने अत्यंत वादग्रस्त वक्तव्ये झाली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांवरील वक्तव्याने चंद्रकांत पाटील अडचणीत आले. फक्त अडचणीत न येता त्यांच्या तोंडावर पुण्यात शाईफेकही झाली. शाईफेक झाल्यानंतर व्हिडिओ चित्रित करणाऱ्या पत्रकारालाच लक्ष्य केल्याने चंद्रकांत पाटील आणखी अडचणीत आले. त्यानंतर पोलिसांचे निलंबन आणि पत्रकारावरील कारवाई मागे घेण्याचं त्यांनी आवाहन केलं. शेवटी त्यांना माफी मागून वादावर पडदा टाकावा लागला.

 

महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्ये करून चंद्रकांत पाटील यांनी कोणताही धडा न घेता त्यांनी सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवरही कधी एकेरी, तर कधी वादग्रस्त वक्तव्ये करत त्यांनी स्वतःला आणखी अडचणीत आणून ठेवले आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, संजय राऊत, नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांच्यावरील टीकेने त्यांना बॅकफूटवर जावं लागलं आहे. सततची तोंडपाटीलकी त्यांना नडली.

 

✍️ ✍️ ✍️

– परशराम पाटील

You Might Also Like

वडिलांचा ‘तो’ सल्ला ऐकायला हवा होता – अमित ठाकरे

राज्यात तर तीन माकडांचे सरकार- बच्चू कडू

ऑपरेशन सिंदूरसाठी शरद पवारांकडून अभिनंदन

जुन्या ओबीसी आरक्षणा नुसार निवडणुकांचे भुजबळ यांनी केलं स्वागत

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

TAGGED: #Constant #gossip #gone #Invisible #superpower #working #equal #strength #Politics #ChandrakantPatil, #सततची #तोंडपाटीलकी #नडली #अदृश्य #महाशक्ती #सुद्धा #ताकदी #काम #चंद्रकांतपाटील #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दिल्लीला उठवले; महाराष्ट्राला उचकवले; यूपीला सटकवले, कर्नाटकाला भटकवले; अदानीच्या चर्चेला बरोबर संपवले
Next Article भूषण पुरस्कार सोहळ्यात खरे सांगा किती जणांचा मृत्यू झाला ? दुर्घटनेतून घेतला बोध अन् शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?