मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या 50 ते 60 श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. या उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच आता काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक शेअर केला आहे. व्हिडिओसह त्यांनी खरे सांगा किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न सरकारला केला आहे. मात्र अद्याप सरकारने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Tell the truth how many people died in the Bhushan award ceremony? A big decision of Bodh and Shinde government was taken from the accident
खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान उष्माघाताने 13 लोकांचा मृत्यू झाला असून 600 लोकांना त्रास झाला आहे. यावरुन खासदार इम्तियाज जलील यांनी श्री सेवकांच्या मतांसाठी गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 13 जणांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच या लोकांनी 3 तास उन्हात उभं राहुन दाखवावं मी 10 लाख देतो, असे आवाहन देखील दिले आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या 50 ते 60 श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. या उष्माघाताने आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यातच आता काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक शेअर केला आहे. व्हिडिओसह त्यांनी खरे सांगा किती जणांचा मृत्यू झाला? असा प्रश्न सरकारला केला आहे. मात्र अद्याप सरकारने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपल्या डोळ्यांना बरं वाटेल की केवढी गर्दी झाली आहे हे बरं वाटावं म्हणून ही गर्दी करण्यात आली होती. त्यात हे मृत्यू झाले आहेत. मृतांची संख्या जेवढी सांगितली जाते आहे त्यापेक्षा जास्त आहे असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
कार्यक्रम सरकारचा आहे. गर्दी मोठ्या प्रमाणावर आले होते. आदल्या दिवशी रात्रीपासून लोक आले होते. अप्पासाहेबांसाठी लोक आले होते. सरकारने या सगळ्या गर्दीचा फायदा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना फक्त पाच लाखांची मदत सरकारने केली आहे? फक्त पाच लाख रूपये? किमान एक कोटींची मदत केली पाहिजे. तसंच त्यांच्या घरातल्या लोकांना मदत केली पाहिजे. ज्या साधकांना, श्री सेवकांना खुश करण्यासाठी सगळा घाट घातला गेला ते साधक या सरकारवर सर्वाधिक नाराज असतील असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेत मोकळ्या जागेवर कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही, असे आदेश सरकारने दिलेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात काही जणांचा मृत्यू झाल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 14 जणांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. यावर आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘2500 लोक उष्माघाताने मेली याची जबाबदारी संजय राऊत घेणार का? दरवर्षी लोक मरतात याची जबाबदारी संजय राऊत घेणार का?’, असे ते म्हणाले.
विरोधकांकडून राज्य सरकारच्या विरोधात टीकास्त्र सोडलं आहे. या दुर्घटनेनंतर शासनाला जाग आली आहे. राज्य सरकारने मोकळ्या परिसरात शासकीय कार्यक्रमाच्या वेळेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी हा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र पुरस्कार भूषण पुरस्कारावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. खारघर दुर्घटनेत आतापर्यंत १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूने श्रीसदस्यांच्या मृत्यूने त्यांच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकरावर जोरदार टीकास्त्र सोडलं. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मोकळ्या परिसरात सर्व शासकीय कार्यक्रम हे १२ ते ५ या वेळेत न करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान घडलेल्या घटना भविष्यात टाळण्यासाठी शासनाने हे पाऊल उचललं आहे.
निर्णयाबाबत भाष्य करताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘सरकारने जो जी आर काढला आहे, तो योग्यच आहे. १२ ते ५ या वेळेत मोकळ्या जागेवर सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचा तो योग्य आहे. कोणालाही कल्पना नव्हती की असे काही होईल. तीन-चार दिवस तापमान वाढले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली’. ‘विरोधकांचे काम आहे राजीनामा मागणे, पण कोणालाही कल्पना नव्हती की असेल काही होईल. शेड का उभारले नाही, मी यावर बोलू शकत नाही. संबंधित विभागाचे लोक त्यावर बोलू शकतील, असेही ते म्हणाले.