Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धर्मादाय उपायुक्तांनी बाळे खंडोबा देवस्थानाच्या चेअरमन सचिवाचे अधिकार गोठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

धर्मादाय उपायुक्तांनी बाळे खंडोबा देवस्थानाच्या चेअरमन सचिवाचे अधिकार गोठवले

Surajya Digital
Last updated: 2023/04/22 at 7:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
○ बँकेतील खाते हाताळण्यास घातला प्रतिबंधस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

○ बँकेतील खाते हाताळण्यास घातला प्रतिबंध

सोलापूर : श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानचे चेअरमन आणि सचिवांना धार्मादाय उपायुक्त एस.डी. कंकणवाडी यांनी चांगलेच फटकारले आहे. देवस्थानचा चेंज रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. परस्पर बदल अहवाल प्रलंबित असल्याने विनय ढेपे आणि सागर पुजारी यांना अनुक्रमे अध्यक्ष, सचिव म्हणून कामकाज करता येणार नाही असा आदेश देत ढेपे आणि आणि पुजारी यांचे आधिकार गोठवले आहे. Solapur Deputy Charity Commissioner Freezes Powers of Bale Khandoba Temple Chairman Secretary Bank Account

 

बँक खाते हाताळण्यास प्रतिबंध घातला आहे. तसे पत्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना धर्मादाय उपायुक्तांनी दिले आहेत.
श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानमध्ये वाद चालू आहे. अधिकार नसताना देवस्थानाच्या नावे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यावरून 90 लाख रूपये परपस्पर अधिकार नसताना चेअरमन आणि सचिव असल्याचे भासवत विनय ढेपे आणि सागर पुजारी यांनी काढले आणि ०.३२ आर हेक्टर शेतजमीन खरेदी केली. त्यासाठी ७० लाखासह २ कोटी ४ लाखांचा धनादेश दिला.

याविरोधात देवस्थानचे पुजारी, मानकरी, गावकरी आणि भक्तांनी धार्मादाय आयुक्तांकडे तक्रार करत देवस्थानवर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. तसा तक्रारी अर्ज १ मार्च रोजी देण्यात आला होता. तर पैसे काढण्यापूर्वी सिद्राम पुजारी यांनी देवस्थानचे खाते असलेल्या बँकेत अर्ज देऊन ढेपे आणि पुजारी यांना पैसे काढण्याचे आधिकार नसल्याने पैसे काढण्यास मज्जाव करावा असे दोन वेळा पत्र दिले होते. तरी देखिल १६ जानेवारी रोजी ५१ लाख आणि इतर वेळी असे ७० लाख रूपये परस्पर काढल्याची तक्रार धर्मादाय उपायुक्तांकडे केली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

त्यानुसार चौकशी करून धर्मादाय उपायुक्त कंकणवाडी यांनी १० एप्रिल रोजी पत्र देऊन देवस्थानच्या खाते हाताळण्याचा विनय ढेपे आणि सागर पुजारी यांना अधिकार नाहीत त्यामुळे त्यांना सदरचे खाते हाताळण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.

धर्मादाय आयुक्तांना खोटे चेंज रिपोर्ट दाखल करून एका शासकीय संस्थेची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता एखद्याच्या पुजारी मंडळीस ट्रस्टीसाठी पुजारी मंडळीची शिफारस घेऊनच संस्थेचा ट्रस्टी होण्याचा देवस्थानचा कायदा आहे. मात्र बेकायदा नियुक्ती करून खोटा रिपोर्टच्या दाखल करून हा उद्योग केला आहे. लवकर या प्रकरणाचा उलगडा करून खरे कोण खोटे कोण हे खंडोबा भक्तांसमोर आणू, असे विनय ढेपे (चेअरमन श्री खंडोबा देवस्थान ) यांनी सांगितले.

 

श्री खंडेरायाचे खरे मानकरी भक्त असल्याने गैरकारभार करणाऱ्यांच्या विरोधात भक्तांच्या बाजूने कौल दिला आहे. हा सर्व गावकरी, भक्तजण, मानकरी एक प्रकारे आशीर्वाद दिला आहे. शेवटी विजय सत्याचा होतो, असे किशोर पाटील (मानकरी श्री खंडोबा देवस्थान) यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Solapur #Deputy #CharityCommissioner #Freezes #Powers #Bale #Khandoba #Temple #Chairman #Secretary #BankAccount, #सोलापूर #धर्मादाय #उपायुक्त #बाळे #खंडोबा #देवस्थान #चेअरमन #सचिव #अधिकार #गोठवले #बँक #खाते
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत 10 व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Next Article भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे भव्य मिरवणूक

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?