Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातल्या ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल; निघाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरातल्या ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल; निघाला आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Surajya Digital
Last updated: 2023/04/24 at 9:03 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार, सोलापुरातील घटनेत महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

○ महिला आयोगाने घेतली होती दखल, दिले होते मोहोळ पोलिसांना आदेश

 

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली. एका जिल्हा परिषद शाळेच्या वस्ती शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेत सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीवर गेल्या अनेक दिवसापासून लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी त्या शिक्षकाच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात विशेष म्हणजे हा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निघाला आहे. Case filed against ‘that’ teacher; Challa Adarsh ​​Teacher Awardee Mohol Police Order Women’s Commission Inquiry

 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन पिडीत मुलीवर त्याच शाळेतील एका शिक्षकाची वाईट नजर होती. तिला वाईट नजरेने पाहायचा, त्यांना वर्गात बोलावून घ्यायचा, वर्गात आल्यानंतर तिच्या अंगाला हात लावायचा, त्यास विरोध केला आसता माझ्याकडे तुझे प्रुफ आहेत, असे म्हणून ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यात कधी सकाळी वर्गात लवकर आल्यानंतर,तर कधी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत इयत्ता आठवीच्या वर्गात बोलावून पिडीत मुलीवर तिची इच्छा नसताना जबरदस्तीने अत्याचार करीत होता . हि घटना दिनांक १५ एप्रिल रोजी उघड झाली.

 

त्या नंतर पिडीत मुलीला विश्वासात घेऊन माहिती मिळाल्यानंतर दि २३ रोजी पिडीत मुलीच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फीर्याद दिली. त्या शिक्षकावर बाल लैगिंक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या शिक्षकाला मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार, सोलापुरातील घटनेत महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

 

○ शिक्षण विभाग झाला खडबडून जागा

 

मोहोळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून वारंवार अत्याचार होत असल्याचे पत्र माहिला आयोगास प्राप्त झाल्यानंतर महिला आयोगाने याबाबत चौकशी करून कारवाई करण्या बाबत आदेश मोहोळ पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु केली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे

याबाबत समजलेली माहिती अशी आहे की एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये पाच ते सहा शिक्षक काम करतात. या शाळेची विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या ही मोठी आहे. अशा शाळेत एका शिक्षकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना केली. शाळेतील शिक्षक अल्पवयीन असलेल्या शाळेतील विद्यार्थीनीना शिकवण्याच्या नावाखाली शाळा सुटल्यानंतर थांबून घ्यायचा आणि त्या मुलीवर अत्याचार करायचा हा प्रकार नियमितपणे सुरू होता, अशीही चर्चा मोहोळ तालुक्यात सुरू आहे.

 

या घटनेची शहानिशा करण्यासाठी हा शिक्षक मुलींना घेऊन काय शिकवतो हे पाहण्याची त्याची इच्छा झाली. त्याने त्या वर्ग खोलीची हुबेहुब डूप्लीकेट चावी बनवून आत शाळेच्या खोलीमध्ये कॅमेरा बसवले होते, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे. परंतु याबाबत ठोसपणे कोणीही बोलत नाही, कोणाचे नाव घेत नाही व मागील पाच दिवसापासून मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची याबाबत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत खरे नेमके काय झाले हे समजू शकत नाही.

 

दरम्यान याबाबत महाराष्ट्र राज्य जनहीत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैया देशमुख यांनी मोहोळ पोलिसांना लेखी निवेदन दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तरीही मोहोळ पोलीस त्या गावात जावून कानोसा घेत होते. परंतु कारवाई होत नव्हती कुणीच ठामपणे बोलत नव्हते पण चर्चा तर होत होती.

याबाबत या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गावातील एका सुजान नागरिकाने याबाबत महिला आयोगाकडे पत्राव्दारे तक्रार केली. महिला आयोगाने या पत्राची गंभीरपणे दखल घेत तात्काळ मोहोळ पोलिसांना याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मोहोळ पोलिसांनी याबाबत गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांना याबाबत अहवाल मागितला असून शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.

गट शिक्षण अधिकारी मल्लिनाथ स्वामी यांनी शाळेत जावून शिक्षकांचे जबाब घेतले आहेत. शाळेतील मुख्याध्यापक वैद्यकीय रजेवर तर संबंधीत शिक्षकही रजेवर गेला आहे. त्यामुळे त्यांना चार शिक्षकांचे जबाब मिळाले आहेत. याबाबतचा अहवाल गट विकास अधिकारी यांच्यामार्फत मोहोळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे गट शिक्षण अधिकारी मल्लीनाथ स्वामी यांनी सांगितले.

 

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Casefiled #teacher #Challa #Adarsh ​​ #Teacher #Awardee #Mohol #Police #Order #Women'sCommission #Inquiry, #सोलापूर #शिक्षक #गुन्हा #दाखल #आदर्श #शिक्षक #पुरस्कारप्राप्त #महिलाआयोग #दखल #चौकशी #आदेश #मोहोळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात पाच दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता, शेतकऱ्यांचे नुकसान
Next Article ज्येष्ठ लेखक, पत्रकार तारिक फतेह यांचं निधन, पाकिस्तानी वंशाचे पण सच्चे भारतीय

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?