○ संजय राऊतांना सोलापुरातील दाते पंचांग भेट देणार
○ श्री सदस्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्यापेक्षा पीडितांचे अश्रू पुसा
सोलापूर : खारघर दुर्घटनेवरून सध्या राजकारण सुरू आहे आमदार शिंदे यांनीही याचा उपयोग केला आहे. उष्माघाताने श्री सदस्यांचा मृत्यू झाला. Shiv Sena Spokesperson Jyoti Waghmare Visits MLA Praniti Shinde Tola Sanjay Raut Solapur Date Panchang ही दुःखद घटना आहे. प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. सर्व सोयीसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या होत्या. या घटनेनंतर शासनाने दुपारी 12 ते 5 यावेळेस असे कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेतला . पण राजीनाम्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात दोन श्री सदस्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदत केली का? आमदार शिंदे यांनी श्री सदस्यांच्या मृत्यूचा राजकारण करण्यापेक्षा पीडितांचे अश्रू पुसावे, असा टोला शिवसेनेच्या नूतन प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी लगावला.
श्रमिक पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थाने हिंदूहृदय सम्राट होते तर उद्धव ठाकरे हे ‘टोमणे सम्राट’ ही पदवी द्यावी असे वाटते अशी उपरोधिक टीका करतानाच खासदार संजय राऊत हे सतत काही ना काही खोटी भाकीते करत असतात तेव्हा त्यांना सोलापूरचे दाते पंचांग भेट देणार आहे. उद्धव ठाकरे हे नेहमीच आपल्या सभेत ‘हरामखोर’ हा शब्द वापरतात. तेव्हा नेमका हरामखोर कोण ?हे जनताच ठरवेल अशी रोखठोक भूमिका शिवसेनेच्या नूतन प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी येथे मांडली.
याप्रसंगी प्रदेश प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी विविध विषयांवर रोखठोक अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांच्या सभा निराशजनक होत आहेत. उद्धव ठाकरे हे आपल्या सभांमधून हरामखोर असे शब्द वापरतात. त्यावेळी जनता संकटात असताना फोटोग्राफीमध्ये मग्न होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत संघर्षाचे खरे शिलेदार, संघटनेसाठी त्या करणारे भाई एकनाथ शिंदे हेच होते. तेव्हा हरामखोर कोण ? याचा निर्णय जनताच घेणार आहे. गद्दार म्हणून 40 आमदारांवर नेहमी टीका केली जाते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला मग त्याला काय म्हणाल ? असा सवाल प्रा.डॉ.वाघमारे यांनी यावेळी उपस्थित केला.
तब्बल 25 वर्ष भाजपासोबत युती होती. पण मुख्यमंत्री पदासाठी अचानक भूमिका बदलली. सिल्वर ओकवर मुख्यमंत्री पदाचे आमिष दाखवण्यात आले.
फुले – शाहू -आंबेडकरांचे विचार घेऊन चळवळीत कार्य करणाऱ्या सोलापूरच्या लेकीवर विश्वास टाकत राज्याच्या प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रा. ज्योती वाघमारे यांच्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
ग्लोबेल्स नीतीचा वापर करून विरोधक अपप्रचार करत आहेत. तो खोडून काढणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले जनहितार्थ निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी राहणार आहे आणि ती विश्वासाने आणि सार्थपणे पार पाडणार असल्याचेही प्रा. ज्योती वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
○ डॉ. आंबेडकर यांचा पराभव कोणत्या पक्षामुळे झाला ?
पुरोगामी कडून प्रतिग्रामी हा प्रवास कसा या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाले पुरोगामी कोण प्रतिगामी कोण ? याबद्दल अपप्रचार होत आहे. ग्लोबल नीती वापरून हा अपप्रचार केला जात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव कोणत्या पक्षामुळे झाला ? डॉक्टर आंबेडकरांना मंत्रीपदाचा राजीनामा कोणामुळे द्यावा लागला ? त्यांना निवेदन वाचून दिले नाही ? छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व 18 पगड जातींना घेऊन होतं. पंढरपूर वारकऱ्यांचे हिंदुत्व आहे, अशी भूमिका प्रा. वाघमारे यांनी मांडली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे खऱ्या अर्थाने हिंदूहृदय सम्राट होते. उद्धव ठाकरे यांची एकूणच भाषणे ऐकले की त्यांना “टोमणे सम्राट” ही पदवी द्यावी की काय असे वाटते, अशी टीका त्यांनी यावेळी केली. सध्या बाकीच सांगणाऱ्या ज्योतिषांची संख्या वाढली आहे. विश्व प्रवक्ते संजय राऊत हे नेहमीच खोटी भाकिते करतात. त्यामुळे त्यांना सोलापुरातील दाते पंचांग भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कितीही भाकिते ते करू द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
○ सोलापूर विकासासाठी शिवसेना आराखडा तयार करणार
सोलापुरातील विविध प्रश्न आणि विकासासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मिळून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. तेव्हा सोलापुरातील विमानसेवा, बेरोजगारी यासह विविध प्रश्न सोडविण्याकडे पक्ष पदाधिकाऱ्यांकडून प्राधान्याने लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
○ त्यांची जबाबदारी कोणाची होती ?
सन 2009 -10 मध्ये सोलापूर शहरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे कित्येक जणांचा बळी गेला. त्यावेळी काय केलं ? कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांचा मृत्यू झाला ? त्यांची जबाबदारी कोणाची होती? महाविकास आघाडी सरकार असताना कोविडने एक लाख 47 हजार जणांचा बळी गेला मात्र एक लाख 83 हजार लोकांना नुकसान भरपाई दिल्याची आकडेवारी सांगते. याचं गौडबंगाल काय असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातही काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी पुस्तकाचा संदर्भ देऊन त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली. या संदर्भात बोलताना आ. शिंदे यांचे आरोप मान्य नसल्याचे प्रा. ज्योती वाघमारे यांनी म्हटले.