सोलापूर : कोरोना संसर्गामुळे गेल्या चार महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहेत. याचा फटका सर्वांनाच बसला आहे. अगदी गरीबापासून तर मध्यमवर्गीयनासुद्धा फटका बसला आहे. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी धार्मिक स्थळांना आणि सण-उत्सवांना तितकासा दिलासा मिळालेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील सर्व मंदिरे आजही बंद आहेत. भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.
गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करणार आहेत.
लॉकडाउनमुळे विठ्ठल मंदिर 31 ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. साधुसंतांची जी मागणी आहे ती सरकारने मान्य करायला हवी. पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. मी देखील तुमच्या सोबत आंदोलनाला उतरणार, असा शब्द मी त्यांना दिला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
* सोमवारी होणार बैठक
सोमवारी (24 अॉगस्ट) या प्रश्नावर जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. सध्या पंढरपूरमध्ये दोन हजाराहून जादा कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे 24 ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ बनणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.