सोलापूर : राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे.. सोलापुरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. शहरात झाडे उन्मळून पडली, तर बहुतांश भागांमध्ये रस्त्यावर पाण्याचे तळे झाले. Wow! Cloudburst-like rain in Solapur, heavy rain with gale-force winds in Batti Gul
सोलापूर शहरात आज शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरूवात झाली. धुळ्यातही जोरदार पाऊस बरसला. चोपडी तालुक्यात गारपीट झाली. बीड जिल्ह्यात व छत्रपती संभाजीनगर येथेही जोरदार पाऊस झाला. राज्यात पाऊस, गारपीट व वीज कोसळल्याने गेल्या 4 दिवसांत जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला.
सोलापुरात विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. अनेक भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.
सात रस्ता, डफरीन चौक, रामलाल चौक, लक्ष्मी पेठ, बेगम पेठ, मुरारजी पेठ, राघवेंद्र नगर, जुळे साेलापूर, पूर्व विभाग, बाळीवेस, निराळे वस्ती, जोडभावी पेठ, विजापूर वेस, विडी घरकुल आदी भागात झाडे उन्मळून पडल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी झाडे पडल्याने चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. दुकानांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. अनेक भागातील वीज गायब झाली होती. त्यामुळेच नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, तडवळ, खानापूर, गुड्डेवाडी, म्हैसलगी सह परिसरात विजेच्या गडगडाटासह काल गुरूवारी (ता. २७) सायंकाळी अवकाळी पाऊस पडला. अचानक सायंकाळी अंधारून आले व वादळी वा-यासह गारांचा जोरदार पाऊस पडला.
गुड्डेवाडी येथील काशिनाथ विजापूरे यांच्या शेतात नारळाच्या झाडावर वीज पडली. झाडावर वीज पडल्याने आग लागली. तसेच वागदरी, खैराट, किरनळ्ळी, गोगाव सह आदी ठिकाणी सुमारे तासभर पाऊस पडल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. या पावसाने उकाड्याने त्रस्थ झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र शेतक-यांचे या अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने तो चिंतातूर झाला आहे. आज जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.
हवामान खात्याने पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविला होता. कालपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला होता. तापमानाचा पारा खाली उतरला होता. काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
आज शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र थोड्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवली. दुपारनंतर हवामानात बदल झाला अन् ढग दाटून आले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने सुरूवात केली अन् बघता बघता शहरातील सर्वच सखल भागात पाणीच पाणी झाले.