○ स्मार्ट सिटी व “पोचमपाड”मधील संयुक्त तडजोड प्रस्तावाला लवादाने दिली मंजुरी ; निवाडा केला घोषित
सोलापूर : स्मार्ट सिटी आणि पोचमपाड मधील संयुक्त तडजोड प्रस्तावावर लवादाने शुक्रवारी निवाडा (अवॉर्ड) घोषित केला आहे. स्मार्ट सिटी व “पोचमपाड”मधील संयुक्त तडजोड प्रस्तावाला लवादाने मंजुरी दिली. यामुळे पोचमपाड बरोबर करार केल्यानंतर तत्काळ दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या सीईओ शितल तेली – उगले यांनी दिली. After the agreement with Pochampad, the work of the double aqueduct will start soon, the Pune arbitrator heard the Smart City CEO’s compromise proposal was approved.
उजनी- सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामासंदर्भात जुना मक्तेदार असलेल्या पोचमपाड कंपनीने लवादात धाव घेतली होती. या संदर्भात स्मार्ट सिटी व पोचमपाड कंपनी यांच्यात तडजोड करण्यासंदर्भात नियम अटी शर्तीचा अंतिम संयुक्त प्रस्ताव दीर्घ चर्चेनंतर तयार करण्यात आला. या संदर्भात शुक्रवारी ( दि. 28 एप्रिल) पुणे येथे लवादाकडे सुनावणी झाली.
स्मार्ट सिटी व पोचमपाड कंपनीच्या वतीने अटी शर्तीचा संयुक्त तडजोड प्रस्ताव लवादाकडे सादर करण्यात आला. त्यावर सुनावणी झाली. त्या संयुक्त प्रस्तावास लवादाने मंजुरी दिली आहे. लवादाने निवाडाही घोषित केला आहे. त्यानंतर त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होणार आहे, असे सीईओ शितल तेली – उगले यांनी स्पष्ट केले. सीईओ या सुनावणी वेळी हा संयुक्त तडजोड प्रस्ताव सादर करण्यासाठी स्वतः हजर होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नियोजन भवनात झालेल्या मागील बैठकीत 110 एमएलडी योजनेतील जुन्या कामासंदर्भात जुना मक्तेदार पोचमपाड कंपनीने 128 कोटी रुपये अधिक खर्च झालेली रक्कम मागणी केलेली आहे तर दुसरीकडे स्मार्ट सिटी कंपनी 187 कोटी झालेली नुकसान भरपाई मागणीचा दावा केला होता. मात्र दावा प्रतीदावा करण्यात आला. एकमत झाले नव्हते. दरम्यान, अखेर शुक्रवारी स्मार्ट सिटी व पोचमपाड कंपनीने अटी शर्तीचा संयुक्त तडजोड प्रस्ताव लवादाकडे सादर करण्यात आल्यानंतर लवादाने निवडा घोषित केला आहे.
दरम्यान, आता उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामासंदर्भात पोचमपाड कंपनीशी करार करण्यात येणार आहे. या जलवाहिनीचे काम पोचमपाड कंपनी करणार आहे. उद्यापासूनच ही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही सीईओ शितल तेली- उगले यांनी सांगितले.
》 सोलापूर जिल्ह्यातील तीन तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी बढती
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तीन तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी तर तीन नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी बढती मिळाली आहे.
संजय गांधी योजनेच्या तहसीलदार अंजली मरोड, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक साळुंखे, तहसीलदार पाटील यांना अभिजित पाटील उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळाली आहे. मुळचे सोलापूरचे असलेले पण पुणे येथील नायब तहसीलदार संजय भोसले, नागनाथ भोसले या दोन्ही सख्या भावांना तहसीलदारपदी बढती मिळाली आहे.
मोहोळ येथे नायब तहसीलदार असलेल्या लीना खरात यांना तहसीलदारापदी बढती मिळाली. मूळचे पंढरपूर येथील पुणे येथे सेवेत असलेल्या संजय खडतरे यांनाही तहसीलदारापदी बढती मिळाली.