पंढरपूर – पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपला झेंडा कायम राखला असून विरोधी अभिजीत पाटील गटाचा मोठा मताधिक्याने पराभव केला. परिचारक गटाने तीस वर्षा पासून असलेली बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. Pandharpur Bazar Committee’s flag of attendant group; Abhijit Patil Prashant Pracharak, 30 years of power uninterrupted
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी परिचारक गटाला विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आव्हान दिले होते. मात्र परिचारक गटाने तीस वर्षा पासून असलेली बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखली. सत्ताधारी गटाचे सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताने विजयी झाले. यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला.
बाजार समितीच्या एकूण १८ जागा पैकी परिचारक गटाच्या पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत १३ जागेसाठी निवडणूक झाली व या सर्व जागा सत्ताधारी गटाने मोठ्या मताने जिंकल्या. या निवडणुकीमध्ये भालके-काळे या गटाने तटस्थ भूमिका घेतली होती. सुरूवातीला या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अखेरच्या दिवशी हे अर्ज मागे घेतले. यामुळे एकास एक अशी ही लढत झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान येथील शासकीय गोदामात आज शनिवारी सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली साळवे यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीस सुरूवात झाली. सहा टेबलवर ४२ कर्मचारी यासाठी कार्यरत होते. सुरूवाती पासूनच सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघात परिचारक गटाने आघाडी घेतली. पंढरपूर तालुक्यात सोसायटी मतदार संघात परिचारक यांचे एकहाती वर्चस्व आहे. यामुळे या मतदार संघात सत्ताधारी गटाने विरोधी पाटील गटाचा १ हजार ७०० मतांनी पराभव केला. तर ग्रामपंचायत मतदार संघात देखील विरोधकांचा ४०० मतांनी पराभव केला. या एकहाती विजयामुळे पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. शासकीय गोदामपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत गुलाल उधळून व हलगीच्या ठेक्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली.
○ विजयी उमेदवार व मतं
सोसायटी मतदार संघ- हरीश गायकवाड १ हजार ९५७, राजू गावडे १ हजार ९५०, दिलीप चव्हाण १ हजार ९५०, तानाजी पवार १ हजार ९५३, हरिभाऊ ङ्गुगारे १ हजार ९४६, महादेव बागल १ हजार ९४६, संतोष भिंगारे १ हजार ९३०, शारदा अरुण नागटिळक १ हजार ९६६, संजीवनी बंडू पवार १ हजार ९५३, महादेव लवटे १ हजार ९८६,
ग्रामपंचायत मतदार संघ- अभिजीत कवडे ६८६, पंडित शेंबडे ६८६, हमाल व तोलार मतदारसंघ आबाजी शिंदे ६४
● विरोधी पाटील गटाचे उमेदवार व मिळालेली मते –
बाजीराव गायकवाड २२०, राजाराम भोईर कर २५०, सुभाष भोसले २५९, मधुकर मोलाने २५२, रामदास रोंगे २५७, सुरेश सावंत २५३, रमेश पवार ५१, अनिता नंदकुमार बागल २५७, संगीता रायप्पा हळणवर २४६, रुक्मिणी विठ्ठल रणदिवे १, अभिमान जाधव २७८
ग्रामपंचायत मतदार संघ-
विक्रम आसबे २९१, शशिकांत पाटील ४, अनिल बागल ४, विवेक मांडवे २७९, विठ्ठल रणदिवे २, हमाल व तोलार सुधाकर शिंदे १२
तर वसंत चंदनशिवे, शिवदास ताड, सोमनाथ डोंबे, यासीन बागवान व नागनाथ मोहिते हे पाच उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत.
○ अनैतिक पद्धतीने निवडणूक लावली
विजयानंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकारांशी बोलताना, केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी म्हणून अनैतिक पद्धतीने निवडणूक लावली असल्याचा आरोप केला. बाजार समिती ही शेतकर्यांची संस्था असून यामध्ये राजकारण आणू नये असा संकेत आहे. पांडुरंग परिवाराची सत्ता आल्यापासून बाजार समितीची उलाढाल २० कोटी वरून आज ५०० कोटीच्या घरात गेली असून भविष्यात देखील शेतकर्यांना जास्तीत जास्त सुविधा देणार असल्याचे परिचारक यांनी सांगितले.
○ अनैतिक बोलून पंढरपूरचे नाव देशभर घालवणाऱ्यांना अनैतिक चा अर्थ समजला नसावा
प्रशांत परिचारक यांच्या वाक्याला धरून अभिजीत पाटील यांनी देखील प्रशांत परिचारक यांचा चांगला समाचार घेतला. ज्यांनी सैनिकाच्या पत्नी बद्दल अनैतिक बोलून पंढरपूरचे नाव देशभरात घालवणाऱ्या ना अनैतिक शब्दाचा अर्थ समजला नसावा, अशी टीका अभिजीत पाटील यांनी केली आहे. या निवडणुकीत हार झाली मात्र मतदारांनी चांगलं मतदान आमच्या पॅनलला केलं तसेच अनेक नवीन सहकारी या निवडणुकीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.