मोहोळ : मोहोळ येथील नागनाथ क्षिरसागर यांच्या यांच्या देशी दारू च्या गोडावून व कार्यालयाला आग लागून महत्वाच्या कागद पत्रासह ८६ लाखांचा माल जळून खाक झाला आहे. नागनाथ क्षिरसागर हे राजकीय व्यक्तिमत्त्व असून त्यांनी शिवसेनेकडून आमदारकीची निवडणूक लढवली होती. Mohol Political leader’s liquor store set on fire; 86 lakhs along with important documents burnt in Kshirsagar
याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ दत्तात्रय क्षीरसागर यांचे निवास स्थानाजवळच देशी दारु होलसेल विक्रीचे गोडावून व कार्यालय आहे. त्यांचा मुलगा सोमेश क्षिरसागर हा त्या दुकानचे काम पहातो. त्या दिवशी सोमेश हे बाहेरगावी गेले होते व मॅनेजर नेहमी प्रमाणे सायं . ६ वाजता देशी दारू होलसेल विक्रीचे गोडावून व ऑफीस बंद करून निघून गेले होते.
सोमेश रात्री सव्वा दहा वाजणेच्या सुमारास बाहेर गावावरून आले असता गोडावूनच्या शेजारी असणाऱ्या ऑफीस मधून धूर बाहेर येवू लागल्याचे त्यास दिसले. त्यांनी ऑफीसचे शटर उघडले असता आतून धुराचे लोट बाहेर येवू लागले मग त्यानी घरच्याना व कामगाराना आवाज दिला आरडाओरड केली.
सर्व जण बाहेर आले जमेल तसे आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले, परंतु आग मोठी होती. पेटलेली आग आवाक्यात येत नव्हती. म्हणून चिंचोली एमआयडीसी, लोकमंगल साखर कारखाना, लोकनेते साखर कारखाना यांची अग्निशामक वाहने बोलावून घेतली व आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आगीत महत्त्वाची कागदपत्रेही जळाली
या आगीत आनंद संत्रा ब्रँड कंपनीचे दारू ८६ बॉक्स एकूण ४२८ बॉक्स डोकी संत्रा ब्रँड कंपनीचे दारू एकूण ६८३ बॉक्स, ब्रँड कंपनीचे दारू ७४ बॉक्स, बावीस मस्तानी संत्रा ब्रँड कंपनीची दारू ८७ बॉक्स, टॅंगो लाईन ब्रँड कंपनीची दारू ६५ बॉक्स, आमरस संत्रा ब्रँड कंपनीची दारू १३८ बॉक्स यासह इतर कंपन्यांचे दारूबॉक्सेस त्याचबरोबर वॉशिंग मशीन, ऑफिस फर्निचर,यासह इतर महत्त्वाची कागदपत्रे, दारू दुकान लायसन्सची कागदपत्रे , गरजेचे नातेवाईकांची जातीचे दाखले, कागदपत्रे त्याचबरोबर मोहोळचे आमदार यशवंत माने व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्यांच्या जातीच्या दाव्या संदर्भात उच्च न्यायालय मुंबई, नागपूर, खंडपीठ येथे दाखल असलेल्या सर्व याचिकांमधील सादर केलेल्या सर्व कागदपत्रांच्या माहितीच्या अधिकारांमध्ये मिळालेल्या सर्व ठिकाणच्या म्हणजेच शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे व इतर ठिकाणच्या सन १९०० दरम्यान पासूनचे महसुली रेकॉर्ड, फेरफार, सर्वे नंबरचे उतारे, सातबारा उतारे, तसेच जन्ममृत्यु नोंदी, तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या शालेय ओरिजनल प्रति व त्याच्या संचिका, असा एकूण ८० लाख ३५ हजार ९०० रुपयांच्या मालासह इतर महत्त्वाची कागदपत्रे यामध्ये जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.