Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘वऱ्हाड’ रविवारी सोलापुरात, राज्यातील डझनभर नेत्यांची राहणार उपस्थिती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘वऱ्हाड’ रविवारी सोलापुरात, राज्यातील डझनभर नेत्यांची राहणार उपस्थिती

Surajya Digital
Last updated: 2023/05/04 at 11:39 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी २ मे रोजी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. येत्या ५ रोजी राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडीचे संकेत असून त्यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्यातील डझनभर नेत्यांचं ‘वऱ्हाड’ सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहे. NCP’s ‘Wedding’ in Solapur on Sunday, will be attended by dozens of leaders from the state

 

सांगोला तालुक्यातील दोन राजकीय कार्यक्रमांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे हजेरी लावणार असून त्यातील एका कार्यक्रमात साखर सम्राट अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात आले. सांगोला येथील कार्यक्रम सायंकाळी माजी आटोपून सायंकाळी महापौर मनोहर सपाटे यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यासाठी शरद पवार हे हजेरी लावणार आहे.

यावेळी शरद पवार यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते साकडे घालणार आहेत. कालच शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा एकमताने ठराव पारित करण्यात आला आहे. ही बैठक तातडीने घेण्याऐवजी सायंकाळी उशिरा घेतल्याबद्दल शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यावर अनेकांनी तोंडसुख घेतले आहे. तर इकडे पवारांच्या या निर्णयावर बैठक घेण्याचे स्वारस्य जिल्हा राष्ट्रवादीच्या एकाचे नेत्याने न दाखविल्याने पवारांवर कुणाचे प्रेम किती यावरच राष्ट्रवादीत चर्चा रंगू लागली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

○ सुप्रिया सुळे आघाडीवर…

राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडीची घोषणा स्वतः शरद पवार हे ५ मे रोजी मुंबईतून करणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी बुधवारी मुंबईत अध्यक्ष निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. प्रफुल्ल पटेल आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या तीन नावावर चर्चा झाली. यातील प्रफुल्ल पटेल यांनी नकारघंटा वाजविली आहे. तर अजित पवार यांनाही या पदाबाबत स्वारस्थ नसल्याचे समजले. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.

 

● विश्वासात न घेतल्याने नाराजीचा सूर

शरद पवार यांनी अध्यक्षपदाबाबत घेतलेला निर्णय ह कौटुंबिक पातळीवर चर्चा करुन घेतल्याची माहिती बाहेर पडताच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बऱ्याच नेत्यानी मुंबईतील बैठकीत नाराजीचा सूर आवळला. हा शरद पवार यांचा कौटुंबिक मुद्दा नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, त्यामुळे सर्वांना विश्वास का घेतले नाही, असा सूर या बैठकीत उमटल्याचे सांगण्यात आले.

 

 

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #NCP #Wedding #Solapur #Sunday #attended #dozens #leaders #state, #राष्ट्रवादी #काँग्रेस #वऱ्हाड #रविवारी #सोलापूर #राज्य #डझनभर #नेते #उपस्थिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘महाराष्ट्रात अजितदादा, केंद्रात सुप्रियाताई’, अध्यक्षपदाचा 5 मे रोजी निर्णय !
Next Article सोलापूर डीसीसीच्या निवडणुकीचे नेत्यांचे मनसुबे धुळीला, शिंदे – फडणवीस सरकारची खेळी यशस्वी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?